पणजी :गोयंकारपण वृत्त
कोविडविरुद्ध ‘प्रोफेलेक्सिस उपचाराचा भाग म्हणून 18 वर्षांवरील सर्व लोकांना ‘इव्हरमेक्टिन’ औषध देण्याच्या निर्णयाचे समर्थन करीत गोवा सरकारने उच्च न्यायालयात सांगितले की या टॅब्लेटच्या वापरामुळे मृत्यु दर कमी होतो.
‘दक्षिण गोवा वकील संघटने ‘ने कोविडच्या व्यवस्थापन आणि ‘इव्हर्मेक्टिन’ औषधाच्या वापराविषयी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारने सांगितले, की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्वांनाच दिले जाऊ शकत नाही.
‘प्रोफेलेक्सिस’ उपचाराचा एक भाग म्हणून सर्व संशयित आणि लक्षण असलेल्या रुग्णांना औषधे दिली जातील, अशी माहिती राज्याने खंडपीठाला दिली.
‘जागतिक आरोग्य संघटने ‘च्या (डब्ल्यूएचओ) या औषधावरील विश्लेषणामध्ये काही तज्ञ अहवाल आहेत, ज्यानुसार या औषधाचा लवकर उपचार तसेच रोगप्रतिबंधक औषध म्हणून केला गेला तर मृत्यूचे प्रमाण खूपच कमी होत आहे.
“कोविडच्या राज्य तज्ज्ञ समितीने विचारविनिमय केल्यानंतर 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना पाच दिवसांसाठी दररोज एकदाच औषध वापरण्याची शिफारस केली गेली. तथापि, गर्भवती / स्तनदा महिलाना तसेच अलर्जीग्रस्त अशा व्यक्तींना आणि यकृत / मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांना औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, ”असे उत्तर देण्यात आले आहे.
कोविड रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता किंवा ऑक्सिजनच्या पुरवठ्यात व्यत्यय येण्याची घटना राज्य सरकारने नाकारली आहे. गोव्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता सुमारे 55 मेट्रिक टन आहे, असे सरकार सांगते
पुढे, केंद्र सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की २ मे पर्यंत गोव्याला 7.47 लाख डोस देण्यात आले आहेत, त्यातील 9.47 लाख डोसचे सेवन केले गेले असून सध्या राज्यात २.50 लाख डोस उपलब्ध आहेत.
गोव्यामध्ये १ जून ते 15 जून या कालावधीत एकूण, 45,7०० डोस लागण्याची शक्यता आहे. गोव्यातील 18 ते 44 वर्षांच्या लोकसंख्येसाठी एकूण, 36,580 डोस थेट खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात येण्याची शक्यता असल्याचे सरकारने सांगितले.