मडगाव :गोयंकारपण वृत्त
‘एसजीपीडीए होलसेल मार्केट ‘ मध्ये कोरोना प्रकरणात वाढ झाल्यामुळे मासे विक्री बंद झाल्यानंतर किरकोळ व घाऊक विक्रेते आता आपला व्यवसाय करण्यासाठी वेस्टर्न बायपास जवळ केला आहे .
गुरुवारी सकाळी ‘गोयंकारपण ‘ मडगाव घाऊक बाजाराला भेट देण्यासाठी व पाहणी करण्यासाठी गेला असता,गेल्या आठवड्यात ‘एसजीपीडीए’च्या सूचनेनुसार बाजार बंद असल्याचे दिसून आले.
मडगावमध्ये तसेच आसपास भागात कोविडच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता ‘एसजीपीडीए’चे चेअरमन विलफ्रेड डीसा यांनी घाऊक मासे बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.व्यापाऱ्यांकडून बाजारपेठेत ‘एसओपी’चे पालन केले जात नव्हते आणि गर्दीमुळे कोविडचा प्रसार होण्याची शक्यता असल्यामुळे ही बंदी लागू होती.
आज बाजार बंद असल्याचे दिसून आले,परंतु मासे आणणार्या काही मासे व्यापाऱ्यांनी माशांचा बाजार कोणत्याही सामाजिक अंतराशिवाय नवीन पश्चिम महामार्ग बायपासवर अवैधपणे हलविले असल्याचे आढळून आले.
विक्रेत्यानी नवीन पश्चिम महामार्गाच्या दोन्ही बाजूला मासे ट्रक उभे केले होते आणि कोणतेही सामाजिक अंतर न ठेवता रस्त्यावर मासे विकले जात होते.
पोलिसांनी या बेकायदेशीरपणाकडे डोळेझाक करून मौन बाळगणे पसंत केले आहे.
हा परिसर फातोर्डा पोलिस ठाण्याखाली येतो.’गोयंकारपण’लाही पोलिस या बेकायदेशीर मासे बाजारात हजर नसल्याचे निदर्शनास आले.दक्षिण गोवा पोलीस उपअधीक्षक आणि फातोर्डा पोलिसांनी बुधवारी अनावश्यक उघडी असलेली दुकाने बंद केली होती.जे लोक कारणशिवाय बाजारपेठेत फिरत होते त्यांच्यावर कडक कारवाई करताना पोलीस दिसले पण अधिक गर्दी जमलेल्या पश्चिमेकडील बायपासवर कोणतीही कारवाई केली गेली नसल्याने आश्यर्य व्यक्त होत आहे.
Trending
- Smooth Ride? Only for Fortuners, Range Rovers and Road-Immune Elite
- Divided by Nature, United for Cameras
- Twin Blows from Mhadei Projects Threaten Goa’s Future
- Goa Bans Killer Breeds
- Languages of Goa: A Quiet Lesson in Harmony
- Ride the Rapids: Monsoon Rafting Thrills in Goa
- Balrath Buses Only for Students Within 3 km: Goa CM
- GBA Unveils State Ranking Badminton Tournaments for July–August 2025