पणजी:गोयंकारपण वृत्त
फारच थोड्या लोकांना हे माहित आहे की, गोव्याच्या दक्षिणच्या शेवटच्या टोकाजवळ निळेसार पाणी आणि पांढरा वाळू असलेला एक सुंदर किनारा आहे.चक्री वादळामुळे लोकांचे संपूर्ण लक्ष काणकोणच्या अन्य लोकप्रिय समुद्रकिनार्यावर केंद्रित असल्याने पोले बीच आज उध्वस्त झालेल्या अवस्थेत आहे.
शनिवारपासून सलग दोन दिवस वेगवान वारे आणि प्रचंड लाटा समुद्रकिनार्यावर आदळल्या.येथील जमीनीचा प्रमुख भाग लक्ष्मण रायकर यांच्याकडे आहे.सोमवारी ते झोपेतून जागे झाल्यावर, समुद्रकिनाऱ्यावरील सौंदर्य वाढवणाऱ्या नारळाच्या झाडासमवेत बहुतेक किनारपट्टीवरील भाग वाहून गेल्याचे त्यांना दिसून आले.
त्यांनी फोनवर गोयंकारपण शी सपंर्क साधला असता, ते म्हणाले, की आपली जमीन वाहून गेली आहे म्हणून बचावासाठी भिंत बांधण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरही एकदा तपासणीसाठीही ते आले नाही.
रडत ते म्हणाले, की
समुद्राच्या किनाऱ्यावरील त्याची सुमारे अर्धा एकर जमीन वाहून गेली आहे, 40 नारळ झाडे उपटून जमिनीवर पडली आहेत. लाटांचे प्रमाण इतके मोठे होते की बरेच
रायकर यांनी माहिती दिली की
नारळाची झाडे समुद्रात ओढून गेली. नारळच्या झाडाबरोबरच अन्य झाडे जमीनदोस्त झाली.त्यामुळे अधिक जमीन आता निसर्गाच्या कोपासमोर उभी आहे.
रायकरांचे नुकसान होण्याव्यतिरिक्त अनेक स्थानिकांचेही मोठे नुकसान झाले. घरांचे छप्पर वाऱ्याने उडून गेले असले तरी सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
आमची बरीच घरे जुनी आहेत आणि या वाऱ्यामुळे बांधकामचे बरेच नुकसान झाले आहे.
रायकर म्हणाले, “आम्ही मागील 15वर्षांपासून किनारा , शेती लागवड आणि जवळपासच्या घरांच्या संरक्षणासाठी तटबंदीची मागणी करत आहोत. पण एकही सरकारी अधिकारी समुद्रकिनार्याची पाहणी करायलासुद्धा आले नाहीत “अशी प्रतिक्रिया रायकर यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील इतर किनारे प्रसिद्ध असल्याने पर्यटक आणि बरेच लोक तिथेच वास्तव्यास आहेत.त्या समुद्रकिनार्यावर शासनाने आपले लक्ष केंद्रित केले आहे आणि म्हणूनच आपल्यावर सावत्र वागणूक दिली जाते, असे रायकर म्हणाले.