बांबोळी :गोयंकारपण वृत्त
“गोवा वैद्यकीय महाविद्यालया “च्या (गोमेकॉ ) ‘सुपर स्पेशॅलिटी ब्लॉक’ सुरू झाल्यानंतर एका आठवड्यातच निकृष्ट दर्जाचे काम चव्हाट्यावर आले आहे.
शौचालय आणि काही खोल्यांमध्ये ‘फाल्स सिलिंग ‘ कोसळली आहे.
‘गोयंकारपण ‘कडे बोलताना डॉक्टर म्हणाले की, या घटनेमुळे सुपर स्पेशलिटी ब्लॉकचे कामकाजचा दर्जा सिद्ध होत आहे . सरकारच्या म्हणण्यानुसार या रुग्णालयच्या कामासाठी 400 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
आता येथील शौचालयात जाणे धोकादायक बनले आहे अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकाने दिली.
नातेवाईक म्हणाले , “येथील ‘फाल्स सिलिंग ‘ खाली कधी पडेल हे आपणास ठाऊक नसते.”
सुपर स्पेशालिटी ब्लॉक गेल्या आठवड्यात उघडण्यात आला होता आणि शनिवारी आरोग्यमंत्री म्हणाले की सतत गंभीर अशा 350 रूग्णांना ऑक्सिजनचा प्रवाह सतत हवा असल्याने येथील नवीन ब्लॉकमध्ये हलविण्यात आले आहे.
आरोग्यमंत्री ‘पीपीपी’ मोडवर सुपर स्पेशालिटी ब्लॉक देण्यास उत्सुक आहेत.गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे काम हाती घेतले असून त्याचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत हे आहेत.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत टिप्पणीसाठी उपलब्ध नसले, तर उपाध्यक्ष आणि म्हापसाचे आमदार जोशुआ डिसुझा यांनी प्रश्नांना उत्तर दिले नाही.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना विचारले असता, ते म्हणाले की, चक्रीवादळाच्या सद्यस्थितीमुळे सरकारी संस्था, आरोग्य सचिव रवी धवन व गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर हे सुपर स्पेशलिटी ब्लॉक आणि गोमेकॉ येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
“मी सकाळी रुग्णालयात वैयक्तिकरित्या भेट देऊन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. आमची सर्व टीम नवीन प्रोटोकॉल आणि मृत्यू कमी करण्याचे एकमेव उद्दीष्ट घेऊन कठोर परिश्रम घेत आहे. आम्ही अत्याधुनिक सुविधांसह पायाभूत सुविधाही सुधारण्याच्या दिशेने काम करीत आहोत, असे ते म्हणाले.
राणे म्हणाले की, आमच्या डॉक्टरांच्या पथकाच्या आणि तज्ञांच्या सल्ल्याने ते लोकांचे जीवन वाचविण्याच्या दिशेने काम करत आहेत. आम्ही मृत्यू व कोरोनाची प्रकरणे नियंत्रणात आणल्याशिवाय विश्रांती घेणार नाही.
महिला व बाल कल्याण खात्याच्या संचलिका दीपाली नाईक यांच्यासह आमच्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत राणे यांनी बैठकही घेतली. यावेळी उपसंचालक ज्योती देसाई, गोमेकॉचे डीन डॉ. बांदेकर, आरोग्य संचालक डॉ डीसा आणि डॉ. केदार रायकर यांच्यासोबत ‘इव्हर्मेक्टिन’ गोळयाचा उपचार आणि त्याचे वितरण या संदर्भात चर्चा केली.
“येत्या 48 तासांत आम्ही आमच्या ‘डब्ल्यूसीडी’ विभाग आणि अंगणवाडी सेविकांच्या सहकार्याने गोवा राज्यात ‘इव्हरमेक्टिन’ गोळ्या वाटप करणार आहोत. आमच्या अंगणवाडी सेविका 48 तासात घराघरात जाऊन त्याच वाटप करतील. ते कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत आणि त्याचबरोबर कोविड च्या वाढीवर नियंत्रण ठेवू शकतात, असेही ते म्हणाले.