काणकोण :गोयंकारपण वृत्त
येथील श्रीस्थळच्या काही गावकऱ्यांनी त्यांच्या गावातल्या स्मशानभूमीत कोविड बधितावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिल्याने शुक्रवारी कोविड विरुद्ध लढाई लढल्यानंतर मरण पावलेल्यावर पैगणी ग्रामस्थांनी आदर्श दाखवताना अंत्यसंस्कार केला.
गेल्या अनेक दिवसांपासून कोविड संसर्गावर झुंजत असलेल्या व श्रीस्थळ पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वोडामोल येथील रहिवासी असलेले प्रसाद चारी (वय 70) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले.सामान्य प्रथेनुसार मुलाने मृत देहावर अंतिम संस्कार करण्यासाठी देवळाच्या समितीकडे संपर्क साधला.
श्री मल्लिकार्जुन देवळयांच्या मालमत्तेच्या भागामध्ये स्मशानभूमी आहे. समितीने मुलाला कळविले की त्यांनी श्रीस्थल पंचायतीला ‘एनओसी’ दिली आहे आणि त्यांनी वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पंचायतीला कळवावे. त्याच बरोबर वैझावडा येथील काही ग्रामस्थांनी स्मशानभूमी असलेल्या स्थानिक नेत्यांकडे संपर्क साधला. कोविड संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या दुसर्या व्यक्तीला अंत्यसंस्कार करण्याचीही परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी या नेत्याकडे शुक्रवारी केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित आपल्या गावाचा नसल्याचे कारण देऊन त्यांनी तेथे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.शेवटी वैजवाडा स्थानिकांनी गावातील एका खासगी मालमत्तेत अंत्यसंस्कार करावे लागले. प्रसाद चारी यांच्या अंत्यसंस्कारास परवानगी द्यावी यासाठी त्यांनी श्रीस्थलचे माजी सरपंच देवेंद्र नाईक, दामोदर चारी आणि पंचायतचे सचिव संदीप देसाई यांना भेट दिली. त्यांनी सांगितले की यापूर्वी त्यांनी गावा बाहेरील आणखी एकाला असेच अंत्यविधी
करण्याची परवानगी नाकारली होती,आणि ते आता परवानगी कशी देऊ शकतात. यावेळी
युक्तिवाद व प्रति युक्तिवादांमुळे गावकरी आणि त्यांना भेटायला गेलेल्या लोकांमध्ये शब्दांची जोरदार देवाणघेवाण झाली. कारण समजून देणाऱ्यामध्ये आणि अंत्यसंस्कारची परवानगी मागणाऱ्यामध्ये वाद वाडून वातावरण तंग झाले. स्मशानभूमीची मागणी करणार्यांपैकी काहीजण मृतदेह एका रिक्षात ठेवून आणि दुसर्या रिक्षामध्ये लाकूड टाकून स्मशानभूमीकडे निघाले, मात्र तेथूनही त्यांना परत पाठवण्यात आले.
यामुळे शुक्रवारी रात्री, घराच्या बाहेर रिक्षात असलेल्या मृतदेहाच्या छायाचित्रांसह गावकऱ्यांच्या एकतर्फी वागणुकीची बातमी काणकोण व बाहेर व्हायरल झाली.
मृतांना योग्य अंत्यसंस्कार करण्याची परवानगी न देण्याविषयी काही पंच व पैगीणच्या इतर नेत्यांनी मधस्ती करून गावात स्मशानभूमी वापरण्यास मंजुरी दिली आणि शनिवारी प्रसाद चारीच्या मोठया मुलाने त्याच्यावर अंतिम संस्कार केले.