पणजी:गोयंकारपण वृत्त
गोवा सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या आपत्कालीन संकटात आहे, असे सांगून ‘गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ने (जीसीसीआय) कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारला 15 दिवसांच्या कठोर व राज्यव्यापी लॉकडाऊनवर विचार करण्याचे आणि पुढील जीवितहानी टाळण्याचे
आवाहन केले आहे.
“राज्यातील आरोग्यसेवा व पायाभूत सुविधा आधीच कोलमडून जाण्याच्या मार्गावर आहे. वाढते पॉसिटीव्ह रुग्ण आणि मृत्यूची संख्या रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार कमीतकमी 15 दिवस लॉकडाउनचे अत्यंत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. “क्षमता वाढवण्यासाठी आरोग्य सेवा प्रणाली आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे ”जीसीसीआयचे अध्यक्ष मनोज काकुलो म्हणाले.
ते पुढे म्हणाले,की आतापर्यंत प्रयत्न केलेले आणि चाचणी केलेली लॉकडाउनची पद्धत
वापरण्यास ते टाळाटाळ करीत आहेत. नागरिकांचे जीवन टिकवण्याऐवजी आर्थिक पुनरुज्जीवनावर अधिक भर देत आहेत.
ते म्हणाले, की
जीसीसीआयने अशी मागणी केली आहे की कोविड संबंधित औषधांमध्ये गुंतलेले उत्पादक, फार्मास्युटिकल युनिट्सला पुरवठा करणारे सहायक युनिट्स, फूड प्रोसेसिंग / अॅग्रो बेस्ड युनिट्स, या फूड प्रोसेसिंग / अॅग्रो युनिट्सला पुरवठा करणारे सहायक युनिट्स, आवश्यक वस्तू उत्पादक – खाद्य उत्पादने आणि पाणी, प्रक्रिया उद्योग, वरील घटकांना पुरवठा करणारे (कच्चा माल / तयार वस्तू / अर्ध तयार वस्तू / कॅन्टीन / पॅकेजिंग इ) लॉकडाउनमधून सूट देण्याचा विचार करता येईल.