पणजी :गोयंकारपण वृत्त
राज्यातील ईस्पितळातील कोरोना बधित रुग्णांना प्राणवायूचा प्रवाह कायम राहण्यासाठी व टंचाईवर मात करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.मुख्यमंत्री राणे यांनी डॉ. प्रमोद सावंत यांना गोव्यामध्ये १०हून अधिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची शिफारस केली आहे.
आपल्या चिट्टीत राणे यांनी म्हटले आहे,“आम्हाला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात 5हजार लिटर टँकची असलेली क्षमता 15 हजार लिटर पर्यंत वाढवण्यासाठी त्वरित आणखीb१० हजार लिटर क्षमता वाढविण्याची गरज आहे,”
राणे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत पुढे असे नमूद केले आहे,की उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात तीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात चार ऑक्सिजन प्रकल्प , कांसावली येथे एक, ईएसआय हॉस्पिटल- मडगाव येथे दोन आणि 5 ते 10 हजार ऑक्सिजन साठवण्यांची क्षमता असलेले प्रकल्प उभारले जाऊ शकतात. गोमेकॊ येथे 4 ते 5 ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पसोबत 20 हजार लिटर साठवणूक क्षमतेच्या प्रकल्पाची गरज आहे.
“या सर्व प्रकल्पामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत होईल . आमच्या गोमेकॉच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आसपासच्या परिसरात सुमारे 4 ते 5
ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पमध्ये 20 हजार लिटर साठवणूक करता येणे शक्य आहे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या तातडीच्या कमतरतेला तोंड देणे शक्य आहे. ” राणे म्हणाले
“सीमेन्स आम्हाला आवश्यक बॅकअप आणि यंत्रणा देण्यासाठी तयार आहे. मी यासंदर्भात आरोग्य सचिवकडे एक चिठ्ठी आधीच पाठवली आहे”,ते म्हणाले.