पणजी :गोयंकारपण वृत्त
गोमेकॉ येथे काळी बुरशीच्या तक्रारींशी संबंधित आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज सांगितले, की आरोग्य विभाग देशातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून सर्वोत्तम योग्य उपचार मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सूचना व निर्देशानुसार आरोग्यमंत्री राणे यांनी गोमेकॉच्या सर्व विभाग प्रमुखांशी 18 वर्षापर्यंतच्या रूग्णांसाठी काळ्या बुरशीचे प्रकरण हाताळण्यासाठी व पुढील पावले उचलण्यासाठी
उपचार पद्धती, आरोग्यच्या पायाभूत सुविधा यावर मत व शिफारसी जाणून घेण्यासाठी बैठक घेतली .
“मला हे सांगायचं आहे,की आमची टीम डॉ बांदेकर (गोमेकॉचे डीन) यांच्या अध्यक्षतेखाली उपलब्ध सर्वोत्तम आणि योग्य उपचार पद्धतीचे अवलंबन करण्यात येत आहेत. आम्ही यातून कश्या रीतीने बाहेर पडू शकतो हे पाहण्यासाठी आम्ही देशातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात आहोत, असेही त्यांनी ट्विट केले.
ते पुढे म्हणाले, की त्यांनी सुपर स्पेशॅलिटी ब्लॉकमध्ये बालरोग्यांसाठी ‘आयसीयू’ सुरू करण्याचा आणि आमचा तांत्रिक कर्मचारी वर्ग अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही या मुद्द्यावर कृती आराखडा तयार करुन मुख्यमंत्र्यांसमोर मांडायचा विचार केला आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री म्हणाले की, रुग्णांची दर्जेदार काळजी घेण्याबरोबरच सुधारित सुविधा मिळाव्यात यासाठी डॉक्टर प्रयत्नशील आहेत. राज्यात चांगले उपचार आणि मृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही या विषाणूविरूद्ध लढत राहू.