पणजी -गोयंकारपण वृत्त
आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, त्यांच्या आरोग्य विभागाने ‘जीव्हीके ईएमआरआय ‘च्या समन्वयाने 350 रुग्णांना गोमेकॉ येथील नवीन सुपर स्पेशॅलिटी ब्लॉकमध्ये हलवले.
“सध्या आम्ही ‘जीव्हीके ईएमआरआय 108’ च्या समन्वयाने जवळपास 350 रूग्णांना हलविले आहे. सुपर स्पेशियलिटी ब्लॉक येथे आमची टीम त्यांच्यावर देखरेख ठेवली आहे.”
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुपर स्पेशलिटी ब्लॉक लवकरात लवकर सुरू करू. ते ‘पीएमएसवायवाय’ अंतर्गत बांधले गेलेले सर्वात मोठे रुग्णालय आहे.
ते म्हणाले,”आमच्या प्रयत्नात आमचे डॉक्टर, परिचारिका आणि सर्व आरोग्यसेवा कर्मचारी यांचे पथक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासह नवीन ब्लॉकमध्ये रूग्णांचे अखंड संक्रमण सुनिश्चित करीत आहेत.”
अखंड ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि ट्रॉली सिस्टमवरील अवलंबन कमी करण्यासाठी आम्ही गोमेकॉमध्ये २०,००० लिटर मेडिकल ऑक्सिजन टँक बसविणे सुरू केले आहे.