पणजी : गोयंकारपण वृत्त
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात प्रवेशासाठी ‘आरटी-पीसीआर’ चाचण्यांची मागणी करणाऱ्या टीकाकारांच्या विरोधात जोरदार हल्ला चढवला आहे.
“परराज्यात अडकलेले शेकडो गोमंतकीय मला कॉल करीत आहेत. गोमंतकीयांना वेगळी वागणूक का दिले जाते , असे हायकोर्टचे म्हणणे आहे. म्हणूनच आम्ही सर्वांसाठीच ‘आरटी-पीसीआर’ चाचणी अनिवार्य केली आहे, ”ते म्हणाले.
त्यांनी विरोधकांरांवर टीका केली आणि ते म्हणाले, ” सरकारमध्ये असताना काही बोलणाऱ्यांसारखे नाही आणि जेव्हा बाहेर पडतात तेव्हा काहीतरी सांगतात, अशा प्रकारतील आपण नाही .”
ते म्हणाले,की गोव्यामध्ये दररोज 5 हजाराहून अधिक फार्मा कामगार परराज्यातून कामावर येत असल्याने त्यांना अडवण्यासाठी उच्च त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
“त्यांना दररोज कोविड-चे प्रमाणपत्र मिळणे कसे शक्य आहे?फक्त नकारात्मक प्रमाणपत्र पाहिजे, नकारात्मक प्रमाणपत्रमुळे मदत हॊणार नाही. आपल्याला लोकांच्या रोजीरोटीबद्दलही विचार करायला हवा. फार्मा उद्योग संपूर्ण देशाला सेवा देत आहे. औषधांच्या पुरवठ्यावर याचा परिणाम होत असल्याचेही आपण विचारात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.