पणजी:गोयंकारपण वृत्त
‘आम आदमी पक्षा’ने (आप ) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या हट्टीपणामुळे योग्य पद्धतीने लॉकडाऊनला नकार दिल्याबद्दल तसेच त्यांची जबाबदाऱ्या पूर्णत: नाकारल्याबद्दल दोषी धरले आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून गोव्यात होणाऱ्या उच्च पातळीवरील पॉझिटिव्ह दर आणि मृत्यूचा संदर्भ देताना राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, गोवेकरांचे दु: ख वाढवण्यासाठी थेट मुख्यमंत्री सावंत जबाबदार आहेत.
“सावंत दावा करीत आहेत की नवीन प्रकरणे कमी झाली आहेत. परंतु हे अंशतः कमी होणाऱ्या चाचणीमुळे होत आहे.आता प्रति दिन 7,000 वरून 4,000 वर चाचण्या गेल्या आहेत. वास्तविक निर्देशक म्हणजेच पॉझिटिव्ह होण्याचा दर सतत 30-35% च्या वर कायम आहे आणि दररोज सरासरी 40 गोयंकर निधन पावत आहेत ”,म्हांबरे म्हणाले.
म्हांबरे यांनी आठवण करुन दिली की, ‘आप’ने मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना 17 फेब्रुवारी रोजीच्या दुसर्या लाटेबाबत सतर्क केले होते.भाजपा सरकारचे लक्ष निवडणुका आणि खिशे भरण्याकडे जास्त आहे. म्हांबरे म्हणाले की, एप्रिलच्या उत्तरार्धात दुसरी लाट पूर्णपणे आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी ते गांभीर्याने घेण्यास व योग्य तो लोकडॉउन ठेवण्यास नकार दिला.
“दोन किंवा तीन आठवड्यांच्या छोट्या परंतु पूर्ण लॉकडाऊनचा चांगला परिणाम होऊ शकतो. परंतु मुख्यमंत्री सावंत यांच्या वाढीव “बनावट लॉकडाऊन” ने जिवाचे किंवा जीवनाचेही रक्षण करण्यास मदत झाली नाही ”म्हांबरे म्हणाले.
म्हांबरे म्हणाले, कोविड इस्पितळात इतक्या मोठ्या संख्येने सक्रिय प्रकरणे आणि संपूर्ण अनागोंदी कारभारामुळे सरकार कर्फ्यूची अंमलबजावणी अधिक चांगली करेल आणि होम आयसोलेशन प्रोटोकॉलला बळकटी देईल अशी अपेक्षा होती. परंतु त्याऐवजी शासनाने आपली सर्व जबाबदारी सोडून दिली आहे आणि कोणतेही मंत्री किंवा अधिकारी या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचे दिसत नाही.
“सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे सरकारने गृह विलगीकरण प्रोटोकॉलपासून आपले हात कसे काढून घेतले आहेत, यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. गृह विलगीकरणात असणाऱ्या रुग्णाला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे, त्यांना ऑक्सिमीटरने ऑक्सिजन तपासणी करायला सांगणे आणि दररोज दूरध्वनीद्वारे डॉक्टरांद्वारे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता दूर करून, गृह विलगीकरणात असलेले रुग्ण काय करीत आहेत, यावर कोणतेही देखरेख नाही आणि म्हणून नंतर गंभीर परिस्थितीत ते रुग्णालयात पोहोचल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी प्रवेशाच्या दिरंगाईमुळे त्यांच्या मृत्यूला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. ”,म्हांबरे म्हणाले, ‘आप’ने नेमके याच कारणास्तव आपली डॉक्टर हेल्पलाइन आणि ऑक्सिमीटर सेवा सुरू केली.
“दुसरीकडे सावंत यांनी अडचणीं मान्य न करता आणि बेडची कमतरता किंवा ऑक्सिजनच्या संकटासारख्या गंभीर बाबींवर तोडगा न काढता,’सर्व काही ठीक आहे’ असा आग्रह धरला. लॉकडाऊनच्या मुद्द्यावरही त्यांनी जवळजवळ सर्व काही खुले ठेवून कर्फ्यू, निर्बंध अश्या अस्पष्ट शब्दांनी लोकांना गोंधळात टाकले ”,म्हांबरे म्हणाले