कुडचडे :गोयंकारपण वृत्त
कोविड परिस्थितीमुळे राज्यात वाईट परिणाम होत असून बहुतांश पंचायत भागात मान्सूनपूर्व कामांनाही फटका बसला आहे.
शेळडे आणि असोलाडा पंचायतमध्ये बहुतेक सर्व मान्सूनपूर्व कामे पावसाळ्याच्या दोन महिन्यांपूर्वी, म्हणजे
एप्रिल आणि मे महिन्यात सुरू होते.
जूनच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात मान्सून पोहोचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु या पंचायतांमध्ये अद्याप मान्सूनपूर्व कामकाजाची चिन्हे दिसत नाहीत.
याचा परिणाम म्हणून, झाडे आणि झुडुपे वाढलेली आहेत.गटार आणि नाले पूर्णपणे भरली असून काहींचे नुकसान झाले आहे.
“गटारे कचरा आणि चिखलाने भरलेला आहे, ज्यामुळे पावसाळा येताच मुसळधार पावसाच्या वेळी रस्त्यावर कचरा वाहून येणार , असे शेळडे येथील लेस्ली फर्नांडिस यांनी सांगितले.
शेळडेचे सरपंच कैतान लीमा म्हणाले,की शेळडे पंचायतीमध्ये मान्सूनपूर्व काम सुरू झाली होती.परंतु साथीच्या आजारामुळे आता विलंब होत आहे.
ते म्हणाले, “आम्ही नुकतेच काम सुरू केले असून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची आशा आहे.”
असोलडा सरपंच लता राऊत देसाई म्हणतात की पंच सदस्यांसोबत बैठक घेऊन मान्सूनपूर्व काम सुरू होईल.ती म्हणाली, “मान्सूनपूर्व कामांवर यापूर्वी बैठक घेण्याचे नियोजन होते पण साथीच्या रोगामुळे यास उशीर झाला.आता सदस्यांनी त्यांच्या प्रभागांची कामे हाती घेतली आहेत.”
शेळडे चे पंचायत सचिव रवींद्र वडडीकर म्हणाले, “या विषयी अद्याप बैठक झाली नाही,परंतु पावसाळ्यापूर्वी काम सुरू करण्याचे आपण तोंडी निर्देश दिले आहेत.काही पंच सदस्यांनी त्यांच्या प्रभागात काम सुरू केले आहे.” पुढे ते म्हणाले, मान्सूनपूर्व कामे वेळेवर सुरू करणे महत्त्वाचे आहे.जर पावसाळा लवकर आला तर बर्याच समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे नुकसानी होऊ शकते .”