मडगाव :गोयंकारपण वृत्त
अकरा दिवसांपूर्वी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात अचानक केलेल्या कर्फ्यूच्या घोषणेने अनेक गोमंतकीय काहीसे बेसावध सापडले होते. कारण अनेकांनी त्यांची घरे दुरुस्त करण्याची योजना याच काळात आखली होती.
मात्र,शनिवारी चक्रीवादळ वादळाने गोव्याला धडक दिल्यानंतर गोव्यातील बहुतेक घरांवर विपरीत परिणाम झाला. घराचे मालक हार्डवेअरची विक्री करीत असलेले दुकान शोधण्यासाठी शहरांकडे गर्दी केली होती. यापैकी बहुतेक दुकाने बंद असल्याने ते हात हलवत घरी परतले होते.
हार्डवेअरसह, इलेक्ट्रिकल दुकाने लॉकडाऊनमुळे बंद झाल्या आहेत कारण त्या आवश्यक वस्तूंच्या खाली येत नाहीत म्हणून नागरिकांना त्रास होत आहे.
काही नशीबवान लोकांना उपयोगात येऊ शकतील अशी वस्तू खरेदी केले असले तरी दुरुस्ती काम करण्यासाठी कोणतेही कामगार उपलब्ध नव्हते. त्यात मुसळधार पावसामुळे त्रेधातिरपीट उडालायची दक्षिण गोव्यातील अनेकांनी तक्रारी केल्या.
राज्यात सर्व लोक तक्रारी करीत आहेत , की त्यांचे छत अंशतः किंवा पूर्णपणे उडाले आहेत. इतर वस्तूंमध्ये छप्परांवर घालण्याचे प्लास्टिक आणि खिळे यासारख्या वस्तू लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे
उपलब्ध नव्हते.
सध्या सुरू असलेल्या निर्बंधांमुळे आलेल्या संधीचा फायदा घेऊन काही परप्रांतीय कामगार काणकोणतील चार रस्त्यावर, कुक्कळी येथील केटीसी बसस्टँडच्या समोर, मडगावातील पिंपळकट्टा जवळ ,केपे आणि कुडचडे शहरातील काही ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे आणि जाडीची प्लास्टिकचे कापड विकताना दिसले. बुधवारी या सर्वांनी कोरोनासंबधी सर्व काळजी व सूचना वाऱ्यावर टाकून जोरदार विक्री केली, असे अनेक संबंधित स्थानिकांची तक्रार आहे.
एका रात्रीत व्यापारी झालेल्या लोकांनी ग्राहकांकडून जास्त पैसे घेतल्याच्या तक्रारीदेखील आल्या आहेत. कारण दर जाणून घेण्यापेक्षा लोकांना खरेदी करण्यात अधिक रस आहे. एका खरेदीदाराने सांगितले की, त्याने पन्नास मीटर रोलसाठी सहा हजार दिले.विक्रेत्याने मला हिंदी भाषेत सांगितले की प्लास्टिक 50 जीएसएम (प्रति चौरस मीटर ग्रॅम) आहे, परंतु जेव्हा मी घरी पोचल्यावर रोल उघडला तेव्हा मला त्याच्या निर्मात्याकडून लावण्यात आलेला टॅग सापडला ज्यावर ’40 जीएसएम’ लिहिलेले होते.
बाळळी येथील लक्ष्मण गावकर यांनी सांगितले, की रविवारी मंगळवारी त्याच्या घराचे काही कौल चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे उडून गेल्या होत्या. यासाठी कौल आणि खिळे लावण्यासाठी अनेक दुकानात शोध घेतला मात्र तो व्यर्थ ठरला.त्याला कोणतेही दुकान खुले सापडले नाही.
“शेवटी मी मडगाव नगरपालिकेच्या इमारतीजवळ अर्ध्या शटर उघडे असलेले दुकान शोधले. त्यापुढे असलेल्या रांगेत उभा होतो पण माझी वेळ आली तेव्हा मालकाने दुपारी 1.00 वाजता दुकान बंद करण्याचा आदेश असल्याचे सांगून शटर खाली ओढले. यामुळे आम्हला जाणवत असलेल्या वेदना आणि पीडा सरकारने समजून घ्यावे ” तो म्हणाला.
“आता मी कत्रित सापडलो आहे.पुढील काही दिवस जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसाळ्याचे पाणी थेट माझ्या घरात शिरत असल्याने आम्ही टीव्ही, फ्रीज आणि इतर उपकरणे एका सुरक्षित खोलीत हलविली आहेत. मात्र माझ्या भिंती मातीच्या बनविल्या असल्यामुळे कदाचित त्या कोसळण्याची आपल्याला भीती वाटत आहे .एकीकडे आपण कोविडच्या संकटाबरोबर लढा देत आहोत आणि दुसरीकडे निसर्गाने त्यांच्यासारख्या बर्याच गरीब लोकांवर क्रूर थट्टा केली आहे. “तो म्हणाला.