मडगाव:गोयंकारपण वृत्त
केवळ चार रात्रीत गोमेकॉत ऑक्सिजन अभावी 75 रुग्णांना मृत्यू आल्याने गोवा सरकारचा अक्षम्य गलथानपणा उघड झाला असून या मुळे लोकांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.
रात्री 1 ते पहाटे 6 वाजेपर्यंत गोमेकॉत ऑक्सिजन पुरवठ्यात खंड पडतो आणि त्यामुळे रुग्ण दगावतात. ही परिस्थिती सुधारावी यासाठी आता उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सरदेसाई यांनी, या सहा तासांच्या काळ्या कालावधीत 10 मे रोजी 26, 11 मे रोजी 21, 12 मे रोजी 15 तर 13 मे रोजी 13 रुग्ण दगावले. ही परिस्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागणे ही दुर्दैवाची बाब असून सध्या हे राज्य चालवायला हे सरकार अकार्यक्षम असून राज्याच्या कारभार आता उच्च न्यायालयानेच चालवावा अशी लोकांची भावना झाली आहे, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.