पणजी:गोयंकारपण वृत्त
कर्फ्यूचे कोणतेही चांगले परिणाम दिसलेले नसल्याने पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना संपूर्ण लॉकडाऊन विचारात घेण्याची सूचना केली आहे.
खंवटे म्हणाले,“कर्फ्यूचे दृश्य परिणाम न मिळाल्यामुळे प्रमोद सावंत यांनी उच्च जोखमीच्या ठिकाणी ट्रिपल लॉकडाउन लावण्याबरोबर टोटल लॉकडाऊन विचारात घ्यावा असे आपण सुचवले आहे,”
ते पुढे म्हणाले की, मानवी हालचालींवर नियंत्रण ठेवूनच विषाणूच्या हालचाल नियंत्रित केली जाऊ शकते.काळी बुरशीचे आजार देशात मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. गोव्याच्या वैद्यकीय साधन सुविधा आज दुसर्या कोरोना लाटेमुळे , चक्रीवादळ आणि या आजाराशी निगडीत औषधांचा अभावमुळे पंगू झाली आहे.”
खंवटे म्हणाले की, लोकांच्या आयुष्याच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करण्याऐवजी सरकारने दक्षता आणि पूर्वतयारी केली पाहिजे.