पणजी -गोयंकारपण वृत्त
राज्य सरकार भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कोविड लसीकरणासाठी स्तनपान देणाऱ्या महिलांचा समावेश करण्याची योजना आखत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले,“लसीच्या प्रश्नावर सरकार खूप लक्ष देत आहे. कोविड लसीकरण विषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी मी आज संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या थेट प्रेक्षपणात भाग घेणार आहे.
सावंत पुढे म्हणाले की, भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार,राज्यात कोव्हिड लसीकरणासाठी स्तनपान देणाऱ्या महिलांचा समावेश करण्याची योजना तयार केली जात आहे.
18 वर्षा वरील नागरिक आता कोविड लसीकरणासाठी पात्र ठरले आहेत. मार्गदर्शक सूचनांमध्ये नुकत्याच झालेल्या बदलांमुळे, आता स्तनपान करणार्या मातांना भारतातही कोरोना विरोधात ही लस मिळू शकते.
कोणत्याही क्लिनिकल चाचण्यांमध्ये अद्याप स्तनपान करणार्या मातांचा सहभाग नाही. तथापि, ‘डब्ल्यूएचओ’ आणि अग्रगण्य डॉक्टरांनी असे प्रमाणित केले आहे की शरीरात जिवन्त विषाणू इंजेक्ट करणे समाविष्ट नसल्यामुळे या लस अजूनही मोठ्या प्रमाणात सुरक्षित असतात. अशा प्रकारे जेव्हा एखादी स्त्री स्तनपान देईल तेव्हा वापरासाठी विरोध नाही.