पणजी :गोयंकारपण वृत्त
‘भारतीय वैद्यकीय संघटना’ (आयएमए) गोवा शाखेने कोरोनाची “साखळी तोडण्यासाठी “(ब्रेक द चेन ) ‘लॉकडाऊन’ 15 दिवस किंवा त्याहून अधिक वाढवण्याची विनंती केली आहे.
“प्रशासकीय तज्ज्ञांशी बर्यापैकी विचारविनिमय व चर्चा झाल्यानंतर ‘आयएमए’ सोमवार 3 मे २०२१ पासूनचा लॉकडाऊन आणखी किमान 15 दिवस वाढवण्यासाठी किंवा सकारात्मक रुग्णाची सरासरी 50 टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यत खाली येईपर्यंत वाढीव लॉकडाऊन घेण्यास अनुकूल असेल.” आयएमएने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात असेही म्हटले आहे, की मृत्युदर कमी करण्यासाठी , आरोग्य सेवा कमी सकारात्मक रुग्ण संख्येचे व्यवस्थापन करण्यास सक्षम असेल. गेल्या वर्षी लॉकडाऊन सामान्य जीवनासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध झाले नाही.
“आतापर्यंत आर्थिक स्वयं व्यवहार्यतेची गणित भारत आणि गोवा राज्यातील प्रत्येक नागरिकाने शिकला आहे. प्रत्येकजण कमीतकमी जीवनमानची तरतूद करत आहे. ”त्यात म्हटले आहे.
मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कोविड संख्येमुळे जनतेची मानसिकता आधीपासूनच लॉकडाऊन स्वीकारण्याच्या उद्देशाने आहे. याउलट लोक काही अपवादांसह सार्वजनिक ठिकाणी उपस्थित असतील.यामुळे आधीच कामाकाजावरील वाढलेला प्रचंड भार कमी होईल.खाजगी तसेच शासकीय दोन्ही ठिकाणी काही प्रमाणात आरोग्य यंत्रणेकडून होत असलेली तडजोड कमी होईल . “ब्रेक द चेन इफेक्ट” (लॉकडाऊन) आणखी 15 दिवसांनी वाढवावा अशी आमची इच्छा आहे”, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Sorry, there was a YouTube error.