पणजी :गोयंकारपण वृत्त
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यानी ‘गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा’ला (जीएसआयडीसी) साखळी येथे पुलाच्या उदघाटन वेळी गर्दी करून कलम 144 अन्वये नियम न मानल्याबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद प्रमोद सावंत हजर होते.
जिल्हाधिकारी आपल्या आदेशात म्हणाले, की ‘गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड’ने सांखळी येथे वाळवंटी नदीवरील “शाहीद द्वितीय लेफ्टनंट वीरजयेंद्र झोईबा राणे सरदेसाई” पुलाचे उद्घाटन 28 एप्रिल 2022 रोजी केले होते. या उद्घाटनादरम्यान फौजदारी कलम-144चा निषेधात्मक आदेश असूनही मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यानी या प्रकरणी डिचोलीच्या मामलदारांकडे चौकशी अहवालही मागविला आहे.ज्यात असे नमूद केले आहे की ‘जीएसआयडीसी’ कडून उपविभागीय दंडाधिकारी, डिचोली यांच्याकडून परवानगी घेण्यात आलेली नाही आणि २१/04/2021 च्या आदेशाचे उल्लंघन करून उद्घाटन सोहळ्यास गर्दी झाली आहे. या आदेशात पुढे असेही नमूद केले आहे की ‘जीआयडीसी’च्या अधिकाऱ्यानी सदर प्रकल्प राबविताना कोविड सुरक्षेच्या सर्व निकषांचे उल्लंघन केले आहे.उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयाने ही नोटीस मिळाल्यापासून 48 तासांच्या आत भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये जीएसआयडीसीविरुद्ध कायदेशीर कारवाई का सुरू केली जाऊ नये, यासाठी कारण दाखविण्याचे आदेश दिले आहेत.अन्यथा कायद्याखाली योग्य कायदेशीर कारवाई सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी बुधवारी मये मतदारसंघचे आमदार प्रवीण झांट्ये, जि.प.सदस्य,महेश सावंत, साखळी पालिकेचे नगरसेवक, कारापूर सवर्ण सरपंच व इतरांच्या उपस्थितीत विठ्ठलपूर-भंडारवाडा साखळी पुलाचे उद्घाटन केले होते.
1
/
8
#JustCasual With Amit Patkar | “Amit Patkar Ko Gussa Kyun Aata Hai?”
#JustCasual With Joshua De Souza Speaks Candidly on Mapusa, Politics & Michael Lobo,”
#JustCasual With Archit Shantaram Naik GPYC Chief “NOT A NEPO KID, WORKED HARDTO REACH HERE
#JustCasual With Valmiki Naik“Common Minimum Programme Before Seat Sharing”
#JustCasual With Dixon Vaz“South Goa has maintained its identity,”
#JustCasual || Rajan Korgaonkar: Pernem Still Waiting for Mopa Airport Benefits
1
/
8







