‘
कलंगुटःगोयंकारपण वृत्त
रविवारपासून जाहीर करण्यात आलेल्या 15 दिवसांच्या कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी कलंगुट पोलिसांनी कायदा मोडण्याचा पहिला गुन्हा दाखल केला.
कलंगुटमध्ये चार जणांना अटक केली, ज्यात पर्वरी पोलिस स्टेशनच्या एका ‘हिस्ट्रीशीटर’चा समावेश आहे.
कलंगुट पोलीस निरीक्षक नालास्को रापोसो यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या चौघामध्ये म्हणजे – कृष्णा सावलो नाईक – हा पर्वरी पोलिस स्टेशनचा हिस्ट्रीशीटर आहे.तो प्राणघातक हल्ला आणि खुनाच्या प्रयत्नातही सामील होता.वैभव लोटलीकर, त्याची पत्नी आणि मुंबईतील आणखी एक महिलेलाही अटक करण्यात आली आहे.
रापोसो म्हणाले,की या चौघांना जामीन देण्यात आला असून त्यांची मारुती स्विफ्ट कार ताब्यात घेण्यात आली आहे.
ते म्हणाले , “हे चौघेही विनाकारण समुद्रकिनार्यावर फिरत होते.कर्फ्यू लागू असेपर्यंत कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे नोंदवण्याची मोहीम सुरू राहील.कोविड 19 च्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन खूपच गंभीर आहे आणि म्हणूनच आम्ही आदेशांची अंमलबजावणी होते की नाही यासाठी कठोर उपाययोजना करणार आहोत. मी पुन्हा लोकांना घरी राहून सरकारला मदत करण्याचे आवाहन करतो, ”.
Sorry, there was a YouTube error.