केपे : गोयंकरपण वृत्त
राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी केपे तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना (पीएचसी) आवश्यक मदत देण्याचे आश्वासन दिले.
कवळेकर यांनी रविवारी केपे येथील उप जिल्हाधिकारी, मामलतदार, भाग विकास अधिकारी, पालिकेचे मुख्य अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि केपे नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत कोरोनाच्या विरोधात केपेच्या सज्जतेचा आढावा घेताना हे आश्वासन दिले.पीएचसी मध्ये आवश्यक असल्यास ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ला पगार देण्यात आला पाहिजे, जेणेकरून कोविड -19 बाधित नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांमध्ये खंड पडता कामा नये, असे मतही त्यानी व्यक्त केले.यावेळी
बाळळी पीएचसीचे आरोग्य अधिकारी डॉ. तुलसीममता काकोडकर आणि पीएचसी केपेचे डॉ. लोर्ना फर्नांडिस यांनी कोरोना विरोधात प्रभावीपणे शिष्ठाचार राबविण्यासंबंधीच्या अडचणी स्पष्ट केल्या.या समस्याचे त्वरित निराकरणासाठी कवळेकर यांनी आरोग्य खात्याचे संचालकना आवश्यक सूचना दिल्या. लॉकडाऊन काळात कोरोना नियमांचे अनुसरण करावे, असे आवाहन कावळेकर यांनी केले. त्यांनी विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन केले. दुकाने व आस्थापने खुली असली तरी अनावश्यकपणे गर्दी करुन इतरांचे जीवन धोक्यात न घालण्याची विनंतीही त्यांनी केली.
उपजिल्हाधिकारी नीलेश धाईगोडकर, केपेचे मामलदार
लक्ष्मीकांत देसाई; केपे पालिकेचे मुख्य अधिकारी मधु नार्वेकर; केपेचे निरीक्षक दीपक पेडणेकर तसेच केपे पालिकेचे नगरसेवक फिलू डीकोस्टा, सुचिता शिरवईकर, दीपाली नाईक, अमोल काणेकर आणि विल्यम रॉड्रिग आदी या बैठकीत उपस्थित होते.
Sorry, there was a YouTube error.







