पणजी : गोयंकरपण वृत्त –
गोव्यातील बेजबाबदार भाजप सरकारने आज सोमवार दि. ३ मे रोजी बोलविलेल्या गोवा विधानसभेच्या कामकाज सल्लागार समिती बैठकिचा अजेंडा अजुनही पाठवलेला नाही. सरकारच्या जनहित विरोधी व चुकीच्या निर्णयात सहभागी होऊन पापाचा धनी व्हायचा नसल्याने मी आजच्या बैठकिपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी पाठवलेल्या पत्रकात म्हटले आहे.
राज्यातील कोविड परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची व मृतांची संख्या वाढत आहे. गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने आता केवळ रुग्णांना मोफत व वेळेत आरोग्यसेवा देण्याचे कामकाज हाताळावे असा सल्ला मी सरकारला दिला होता असे कामत यांनी म्हटले आहे.
गोवा विधीमंडळ सचिवालयाने गुरूवारी एक सुचना पत्र जारी करुन विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सोमवार दि. ३ मे २०२१ रोजी संध्याकाळी ४ वाजता बोलविली असल्याचे कळविले होते.
विधानसभेचे सत्र १९ जुलै २०२१ रोजी परत सुरू होणार असल्याचे स्पष्ट असताना, आता अचानक सरकारला कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्याची का गरज भासते हे जाणुन घेणे गरजेचे आहे असे सांगुन सरकारने सर्व आमदारांना त्याची कल्पना द्यावी,अशी मागणी मी केली होती.परंतु असंवेदनशील भाजप सरकारने त्यावर काहिच कृती केली नाही.
सरकार एकिकडे विरोधी पक्ष व आमदारांचे कोविड हातळणीसाठी सहकार्य मागते व दुसरीकडे आमदारांना विश्वासात न घेता , लपवा छपवी करुन आपला छूपा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करते हे दुर्देवी आहे असे कामत यांनी म्हटले आहे.
Sorry, there was a YouTube error.