पणजी :गोयंकारपण वृत्त
शिरवई -केपे येथे शुक्रवारी शेजारच्या सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
याप्रकरणी केपे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी सांगितले की, सदर मुलगी आपल्या आईवडिलांसोबत शिरवई येथील नातेवाईकांच्या घरी आली होती.
हे नातेवाईक भाड्याच्या घरात राहत होते.शेजारील घरातील 21 वर्षीय ओमकार लोटुलकर याची या मुलीशी मैत्री झाली. त्याने मुलीला मोबाईल देऊन आकर्षित केले आणि तिला खोलीत नेऊन हा गुन्हा केला, असे केपे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी आरोपीस अटक करण्यात आली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आज त्याला पुन्हा पणजी येथे बाल न्यायालयात हजर करण्यात येईल.
Sorry, there was a YouTube error.