पणजी :गोयंकारपण वृत्त
‘आम आदमी पक्षा’ने (आप ) आज सांगितले की, गोव्यात आधीच साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या गोवेकरांना लुबाडण्याचे नवीन मार्ग भाजपा शोधत आहे. ताजी घटना म्हणजे कळंगुट गावाचे “शहरी भागात” रूपांतर करणे म्हणजे गोवेकरांची जमीन हस्तगत करण्याच्या पहिले पाऊलच आहे. भू-माफियाशी संबंधित दलाल व्यवहार करतात आणि गोवेकरांना अडचणीत टाकून त्याचा फायदा घेतात.या हालचालीमुळे पुढे पाण्याच्या बिलात वाढ, वीज आणि गृह करात लक्षणीय वाढ होईल. अशा प्रकारे कठीण परिस्थितीमध्ये खाली कोसळलेल्या गोवेकरांना ते लाथा घालत आहेत. मोलेतील वादग्रस्त तीन प्रकल्पांप्रमाणेच सामान्य गोवेकरांची फसवणूक करण्यासाठी लॉकडाऊन असताना,रात्री चोरुन हे रूपांतर केले जात आहे.
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, कळंगुट सारख्या पर्यटन क्षेत्रामध्ये जेथे उत्पन्न पर्यटनाशी संबंधित आहे. लॉकडाऊनमुळे आधीच ते तोट्यात आहे आणि शासनाच्या कठोर धोरणांमुळे त्यांना आधीच तोटा झाला आहे. देशात महामारीचा देशात सर्वात वाईट फटका गोवाला पडला आहे. या रोगराईने अनेक गोवेकरांना वाईट स्थितीत सोडले आहे. संपूर्ण गोव्यात विजेसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीच वाढल्या असून इंधनाच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यामुळे सामान्य घरगुती वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे.
मध्यंतरी कळंगुटला “शहरी भागात” रुपांतर करणे हा भाजपला भू-माफियांच्या माध्यमातून गोवेकरांकडून देखील जमीन चोरण्याचा आणखी एक मार्ग आहे.
‘आप’चे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, मायकल लोबो आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सदर हालचाल म्हणजे गोवेकरांकडून काही चोरी करण्याच्या शिवाय काहीच नाही. ते विरोधी पक्षांच्या नेत्यांना अधिक पैसे देऊन खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त पैसे खिशात भरण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
“गोवेकरांची चिंता कमी करण्याचे काम करण्याऐवजी भाजपा सरकार आमच्या जमीन चोरून जमीन माफियासाठी त्या सुलभ करण्याचा प्रयत्न करीत आहे!”असे आपचे प्रवक्ते आणि कळंगुट मधील पक्षाचे नेते मॅन्युएल कार्दोज म्हणाले.