पणजी :गोयंकारपण वृत्त
राज्यात गेल्या 24 तासात 4,195 कोरोनाबधित सापडले असून आतापर्यंत एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा सर्वाधिक मोठा आकडा आहे.
राज्यात शुक्रवारी कोरोनामुळे 56 जणांचा मृत्यू झाला असून गोव्यात आतापर्यंत मृत पावलेल्यांची संख्या दिड हजारी पार जाताना 1557 झाली आहे.राज्यात सक्रिय रुग्ण संख्या 31,716 झाली आहे.
मृत्यू पावलेल्या 56पैकी गोमेकॉत 32, दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलत -16,उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलत-2 व अन्य 6 जणांचा बळी गेला आहे.
यात शुक्रवारी 2175 रुग्ण बरे होऊन घरी पोचले आहेत.एकूण आतापर्यंत 79,189 जणांनी कोरोनावर मात केली असून बरे होण्याचा हा दर 70.41 टक्के आहे. एका दिवसात 3606 जणांनी घरातच अलगीकरणात राहणे पसंत केले असून 296 जण रुग्णालयत भरती झाले आहेत.
Sorry, there was a YouTube error.