पणजी :गोयंकारपण वृत्त
राज्यात गुरुवारी कोरोनामुळे 58 जणांचा मृत्यू झाला असून गोव्यात आतापर्यंत मृत पावलेल्यांची संख्या दिड हजारी पार गेली आहे.राज्यात सक्रिय रुग्ण संख्या 29,752 झाली असून 30 हजारच्या भोज्याला स्पर्श करण्याच्या जवळ पोचली आहे.
58 मृत्यू पावलेल्यापैकी गोमेकॉत 35, दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलत -18,उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलत-2 व अन्य 3 जणांचा बळी गेला आहे.
यात गुरुवारी 2023 रुग्ण बरे होऊन घरी पोचले असून तीच थोडी दिलासा देणारी बाब आहे.
दरम्यान, गुरुवारी लसीकरणचा पहिला डोस 2954 व दुसरा डोस 1490 मिळून 4,444 जणांनी लस टोचुन घेतली आहे. आतापर्यंत 3 लाख 69 हजार 849 जणांना लसीचा लाभ घेतला आहे.
Sorry, there was a YouTube error.