पणजी -गोयंकारपण वृत्त
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, आज राज्याला 323 ऑक्सिजन ‘कन्सेन्टरेटर्स’ मिळणार आहेत.
मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करून म्हटले,“आज आम्हाला 3२3 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर प्राप्त होत आहेत, जे भारतीय हवाई दलाद्वारे गोव्यात आणले जातील. यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार.”
मुख्यमंत्री सावंत यांनी आज डीचोली येथील ‘केशव सेवा साधना’ येथील’ स्टेप-अप’ हॉस्पिटलला भेट दिली आणि सध्याच्या रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला असून सध्या 70 खाटांची क्षमता आहे.
ते म्हणाले, “सध्या 33 कोविड रूग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 10 जण प्रणवयुवर आहेत.
ते म्हणाले की, डॉ. मेधा साळकर, डॉ. गौरीश पळव, डॉ. शेखर साळकर, आयुष डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी कोव्हीड रुग्णांच्या उपचारांसाठी चोवीस तास कार्यरत आहेत.
“स्टेप-अप रुग्णालय जिल्हा रुग्णालय तसेच गोमेकॉवरील ताण बर्याच प्रमाणात कमी करत आहेत,” असे ते पुढे म्हणाले







