पणजी : गोयंकरपण वृत्त
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी निवासी डॉक्टरची संघटना असलेल्या ‘जीएआरडी’च्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.
राणे यांनी रविवारी ‘जी.ए.आर.डी असोसिएशन’चे डॉ. प्रतीक सावंत, डॉ अजय आणि इतरांशी संवाद साधून चर्चा केली.
“कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘जी.ए.आर.डी’ ही आमची कणा आहे. त्याच्या सोबत झालेल्या चर्चा दरम्यान आम्ही त्यांच्याकडून सूचना घेतल्या आणि त्यांचे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावतील अशी ग्वाही दिली. ” राणे म्हणाले
ते पुढे म्हणाले की, त्यांच्या समस्या मान्य झाल्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविण्यास सरकार त्यांना पाठिंबा देईल आणि वेळोवेळी संघटनेच्या संपर्कात राहील.
“या अभूतपूर्व काळात नागरिकांची सेवा करण्याच्या त्यांच्या निःस्वार्थ प्रयत्ना आणि समर्पणाबद्दल गोवा राज्य त्यांचे अभिनंदन करतो.” असे राणे म्हणाले.
राणे पुढे म्हणाले की, कोविड रूग्णांशी संबंधित विविध डॉक्टरांशी त्यांची भेट झाली आणि त्यांनी चर्चादरम्यान काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले.
आपण त्यांना आश्वासन दिलं आहे की सरकार संपूर्ण सहकार्य करेल. आम्ही एकत्र येऊन सर्व बाबींवर एकत्रितरित्या संघ म्हणून मात करू,” राणे म्हणाले
दरम्यान, कोविड रुग्णांसाठी सुरू केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राणे यांनी सुपर स्पेशलिटी ब्लॉकला भेट दिली. “आम्ही बेड्स, वातानुकूलीत व्यवस्था आणि इतर उपकरण स्थापना करण्याबाबत चर्चा केली.अनेक वस्तू अजून येणे बाकी आहे. माझ्या भेटीदरम्यान, रुग्णांना हाताळण्यासाठी आणि नर्ससाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचार्यांच्या आवश्यकतेसाठी आणि अत्याधुनिक देखभाल करण्यासाठी आपण आढावा घेतला , ”ते पुढे म्हणाले.
Sorry, there was a YouTube error.