पणजी:गोयंकारपण वृत्त
लोकांच्या तसेच सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या मागणीला मान देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी राज्यात 15 दिवसांच्या ‘कर्फ्यू’ची घोषणा केली.येत्या दि. 9 मे ते 24 May मे २०२० या कालावधीत,आवश्यक सेवा आणि किराणा सामानाच्या पुरवठयावर परिणाम न करता हा कर्फ्यू पाळला जाणार आहे.
या विषयी घेतलेल्या आभासी पत्रकार परिषदेत
मुख्यमंत्री म्हणाले की
“रविवारी सकाळी 6 वाजता राज्यस्तरीय कर्फ्यू लागू होणार आहे.आवश्यक सेवा आणि किराणा माल सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत उपलब्ध असेल. रेस्टॉरंट मध्ये ‘टेक अवे किचन’ सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत खुले असेल. जिल्हाधिकाऱ्यांचा सविस्तर आदेश शनिवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निघेल.
ते म्हणाले, की लोक ‘एसओपी’चे पालन करीत नाहीत, यामुळे रविवारीपासून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येणार आहेत.
लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये.अनावश्यकपणे फिरणार्या लोकांवर पोलिस कारवाई करतील.
96 टक्के लस न घेतलेल्या लोकांचा मृत्यू झाला आहे.
बरे झालेल्यांचा दर 71 ते 74 टक्के आहे. राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण जनतेनेही सहकार्य करावे लागेल, असे ते म्हणाले.
ते म्हणाले,की ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्यांच्यासाठी’ स्टेप अप’ रुग्णालये सुरू केली जात आहेत .लॉकडाउनची मागणी करणे सोपे आहे,परंतु राज्य प्रमुख म्हणून आपल्याला ते व्यावहारिक वाटत नाही. आपल्याला सर्व लोकांचे कल्याण पहावे लागेल. पायाभूत सुविधा निर्माण करणे हे माझे काम आहे. लोक घरी राहून स्वतःची काळजी घेऊ शकले असते,तर आम्ही या टप्प्यावर पोहोचलोच नसतो.
ते म्हणाले, “लोक ऐकत नाहीत आणि म्हणूनच कायदा लागू करून प्रत्येकावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना लाठीचा वापर करावा लागत आहे ,” ते म्हणाले.
Sorry, there was a YouTube error.