पणजी -गोयंकारपण वृत्त
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, सरकारने फार्मा / औषध पुरवठा साखळीत काम करणाऱ्या कामगारांना ‘कोव्हीड हेल्थकेअर कामगार’ म्हणून विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
सावंत म्हणाले,की आमच्या सरकारने फार्मास्युटिकल्स / औषध पुरवठा साखळीत उत्पादनापासून किरकोळ विक्रीपर्यंत काम करणाऱ्या कामगारांना अग्रणी ‘कोव्हीड हेल्थकेअर योद्धा’ म्हणून विचार करण्याचा निर्णय घेतला आहे, ”
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की दिव्यांग / अपंगत्व असणार्या विशेष व्यक्तींनासुद्धा लसीकरणासाठी प्राधान्य देण्याचे विचारात घेतले जाईल.आरोग्य विभाग आदेश जारी करेल,” ते म्हणाले
गोव्यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना अग्रणी ‘कोव्हीड हेल्थकेअर योद्धा’ गटामध्ये समाविष्ट करण्यात आले होते आणि त्यांना प्राधान्याने कोविडविरोधावरील लसी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली होती.