
पणजी: गोयंकारपण वृत्त
भ्रष्टाचारचा उघड प्रकार आता क्रिडा खात्यातही पोहचला आहे.सांताक्रूझ येथील फुटबॉल मैदानावर ‘सिंथेटिक टर्फ’ घालण्यात असा घोटाळा होत आहे. हा घोटाळा काही चिनी कंपनीला लाभ करुन देण्यासाठी केला जात आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
चोडणकर पुढे म्हणाले, की मैदानाच्या सुधारित टेंडरमध्ये अधोरेखित केलेल्या अटींमध्ये असे नमूद केले आहे की ‘लूसोफिनिया गेम्स’ किंवा ‘नॅशनल गेम्स’साठी ज्या कंपन्यांनी ‘सिंथेटिक टर्फ’ घालण्याचा अनुभव आहे, त्यांनाच काम करण्यास प्राधान्य दिले जाईल. पण राष्ट्रीय किंवा लुसोफोनिया गेम्स या दोन्हीपैकी एकाही खेळात त्याचा वापर झालेला नाही.” असे चोडणकर यांनी निदर्शनास आणून दिले.
क्रिडा मंत्री बाबू आजगावकर व त्यांचे बंधू डॉ. श्रीकांत अजगावकर (जे सरकारी सेवक असूनही गोवा फुटबॉल विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत) यांच्या गेल्या तीन वर्षात चीनच्या संशयास्पद भेटींबाबत चौकशी केली पाहिजे. तसेच भाजपाचे आमदार टोनी फर्नांडिस यांनीही अशा प्रकारच्या बेकायदेशीरपणाला पाठिंबा देण्यासाठी किती प्रमाणात लाभ मिळाला हे स्पष्ट झाले पाहिजे असे चोडणकर म्हणाले.
युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाची कोणतीही मंजुरी न घेताही आजगावकर कुटुंबातील इतर सदस्य चीन मध्ये ही डील करण्यासाठी गेला होते काय याचीही चौकशी व्हायला पाहिजे,असे ते म्हणाले.
अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये, मातीच्या गुणवत्तेची चाचणी, क्षेत्रासह टर्फ्ची जाडी ‘फिफा’ने मंजूर करायची असते. केंद्र सरकारने चाचणीची घातलेली ही अट अनिवार्य केली आहे. गुणवत्ता आणि पारदर्शकतेनुसार निविदा काढतात. पण सांताक्रूझ येथील या प्रकल्पात चाचणीच्या आवश्यकतेचा उल्लेख नाही, ज्यामुळे प्रकल्प मालकाला ‘सब-स्टँडर्ड प्रोजेक्ट’च्या कामाचा धोका पत्करावा लागेल. यामुळे चीनमधून ‘डुप्लिकेट टर्फ ‘वापरला जाउ शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे.
आमचा विश्वास आहे की, राज्याला लुटण्याच्या उद्देशाने काही चिनी कंपन्यांच्या सहकार्याने कमी दर्जाचे साहित्य व उपकरणांच पुरवठा करण्यासाठी आजगावकरांनी करार केला आहे. टर्फ मैदान उभारण्याच्या या गैरप्रकारला नकार दिला तर राज्याची १.२४ कोटी रुपयांची बचत होईल, असे चोडणकर म्हणाले.







