पणजी -गोयंकारपण वृत्त
राज्यात कोरोना महामारी आजाराची वाढती तीव्रता आणि रुग्णांना प्राणवायुच्या कमतरतेला तोंड देत असतानाच, पणजीचे आमदार बाबूश मोन्सरात यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ,मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा श्वास
कोंडल्यागत स्थिती झाली आहे.
कोविडमुळे शेकडो रूग्णांचा प्राणवायूच्या टंचाईमुळे मृत्यू झाला आहे आणि राज्य सरकार अद्याप प्राणवायूचा पुरवठा सुरळीत करू शकलेले नाही.त्यात, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत विविध आरोग्यविषयक बाबींशी झुंज देत असताना आणि राज्यातील अनेक
ग्रामपंचायतींनी पुकारलेल्या स्वेच्छा लॉकडाऊनला सामोरे जात असताना,त्यांच्या समोर राजकीय पेचप्रसंग येणार असे कुणाला स्वप्नातही वाटले नसेल.
बाबुश मोनसेरात आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यामध्ये विस्तव जात नसल्याचे सूत्रांकडून समजते.त्यात पणजीचे आमदार अतानासिओ (बाबुश) मोनसेरात यांनी सोमवारी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली,व ते म्हणाले की काही मंत्र्यांची कामे शून्य असून केवळ आपल्या मतदारसंघापुरते त्यांनी आपले काम मर्यादित ठेवले आहे.
“काही मंत्र्यांची कामे शून्य आहेत,आणि त्यांनी त्यांचे काम फक्त आपल्या मतदारसंघपुरते मर्यादित केले असल्याचे आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधले आहे,” मोनसेरात म्हणाले.
ते पुढे म्हणाले,की सत्ताधारी पक्षात १२ मंत्री आणि 18 आमदार आहेत, तथापि हे आमदार दुर्लक्षित आहेत . हे मंत्री राज्यासाठी काम करत नाहीत, तर त्यांनी केवळ आपल्या मतदारसंघापुरते काम मर्यादित केले आहे.
असे काही मंत्री आहेत, ज्यांना त्यांच्याच विभागात काय चालले आहे याची माहिती नसते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेण्याची व तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, असे मोनसेरात म्हणाले.
कोणत्या विशिष्ट मंत्र्याबद्दल आपण तक्रार केली आहे का, असे विचारले असता मोनसेरात म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना जे सांगायचे होते ते मी सांगितले आहे. कारवाई करणे की नाही, ते त्यांच्यावर अवलंबून आहे. ”
सूत्रांनी सांगितले की, मोनसेरात यांनी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्यासाठी 8 दिवसांचा अवधी दिला असून ते या विषयावर सार्वजनिक भाष्य करणार असल्याचा इशारा दिला आहे.
हे आता स्पष्ट झाले आहे की कचरा व्यवस्थापन मंत्री मायकेल लोबो यांच्यासह अनेक मंत्र्यांशी बाबुशचे चांगले संबंध नाही.जुने गोवाला ‘ग्रेटर पीडीए’च्या अंतर्गत आणण्याबाबत दोघांचे मतभेद आहेत .त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत .
दरम्यान,सावंत यांच्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध घालण्याचा आणि संपूर्ण लॉकडाउन न करण्याच्या निर्णयाचेही बाबूश यांनी स्वागत केले.
“कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि संपूर्ण लॉकडाउन बंदी न घालण्यासाठी निर्बंध वाढवण्याच्या मुख्यमंत्री सावंत याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. काळजी आणि सावधगिरी बाळगणे आता प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे, असेही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, कोरोनाच्या दुसर्या लाटेत व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असेही पणजी आमदार म्हणाले.
Sorry, there was a YouTube error.