म्हापसा :गोयंकारपण वृत्त
कोविड -19 प्रकरणी अचानक वाढ झाल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने आज म्हापसा मतदारसंघातील १० क्षेत्रांना “मायक्रो कंटेन्टमेन्ट झोन” म्हणून घोषित केले.
या आदेशानुसार खोर्ली -गांधीनगर, एकता नगर, आल्तीनो म्हापसा , गृहनिर्माण मंडळ- गणेशपुरी, दत्तवाडी, डांगी कॉलनी, करासवाडा, धुलेर, शेट्टीवाडो आणि गावसवाडो मधील काही जागा मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कोरोनाव्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी हे उपाय केले गेले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी इतर सार्वजनिक आरोग्य उपायांसह संशयास्पद रुग्णाची तपासणी आणि चाचणी, अलगीकरणात ठेवणे, विलग ठेवणे, सामाजिक अंतर व तपासण्यासह परिस्थितीचा सामना करण्यासाठी सविस्तर कृती योजना देखील जारी केली आहे . जलद प्रतिसाद पथकही तैनात करण्यात आले आहे.
सद्यस्थितीतील परिस्थितीचा सामना करण्यासाठी मायक्रो कंटेनमेंट झोनमधील लोकांची स्क्रीनिंग, संशयित प्रकरणांची चाचणी, अलगीकरणात ठेवणे, विलगीकरण करणे , सामाजिक अंतर आणि इतर सार्वजनिक आरोग्य उपायांसह अन्य कृती योजना राबविण्यास सूचविले आहे.
उपरोक्त क्षेत्रातील आजारी व्यक्तींची मोबाईल तपासणीद्वारे आरोग्य तपासणी करून घ्यावी व त्या यादीमध्ये लाल शाईने आजारी असलेल्या व्यक्तीची नावं तयार केली जावी, जेणेकरून पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल. आवश्यकतेनुसार सर्व सकारात्मक प्रकरणे पुढील उपचारासाठी ‘कोविड केअर सेंटर’ किंवा कोविड रुग्णालयात हलविण्यात येतील, असे कळवण्यात आले आहे.
आरोग्य अधिकारी, शहरी आरोग्य केंद्रे , बारदेश , गोवा यांनी वैद्यकीय नियमावलीनुसार संशयीताच्या जवळच्या सर्व संपर्कांची तपासणी / चाचणी करणे आणि या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे संपर्क शोधणे सुनिश्चित केले आहे.
Sorry, there was a YouTube error.







