पणजी :गोयंकारपण वृत्त
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोवा सरकारने “आत्मनिर्भर भारत – स्वयंपूर्ण गोवा” संबंधित सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत.
” राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामध्ये होत असलेल्या वाढीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून,
सर्व स्वयंपूर्ण पर्यवेक्षक , तालुका नोडल अधिकारी, स्वयंपूर्ण मित्र आणि स्वयंसेवक सहाय्यक यांना पुढील आदेश जारी होईपर्यंत या उपक्रमांतर्गत सर्व कार्यक्रम स्थगित करावेत ,” असे आदेशात नमूद केले आहे.
राज्य सरकारच्या लाभार्थीभिमुख योजनांद्वारे राज्यातील शेवटच्या व्यक्तीच्या दारात पोहोचण्याच्या उद्देशाने
गोवा सरकारने “आत्मनिर्भर भारत – स्वयंपूर्ण गोवा” उपक्रम सुरू केला होता. बेरोजगार तरुणांची कौशल्य आणि सामर्थ तसेच लोकांच्या गरजा ओळखून त्याद्वारे ‘कमी सरकार आणि अधिक प्रशासन’च्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला होता.
Sorry, there was a YouTube error.






