पणजी:गोयंकारपण वृत्त
राज्य सरकारने म्हटले आहे की ‘भारत बायोटेक’, हैदराबाद येथून ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या 2 लाख डोसची खरेदी प्रक्रिया सुरू केली गेली आहे.
“0 ते 18 प्रवर्गातील व्यक्तींची राज्यात 4.65 लाख अंदाजे लोकसंख्या आहे. तसेच, लसी घेण्याकरिता ‘ग्लोबल टेंडरिंग’ची प्रक्रिया सुरू केली गेली आहे.” सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.
आतापर्यंत गोवा राज्यात भारत सरकारकडून ‘कोव्हीशिलड’ लसिचे 7,31,720 डोस प्राप्त झाले आहेत.
18 ते 44 वयोगटातील .6.5 लाख लोकसंख्या विचारात घेऊन राज्य सरकारने घोषित किंमतीनुसार ‘जीओआय’च्या धोरणानुसार ‘सीरम इन्स्टिट्यूट’कडून कोव्हीशिलड लसच्या 5 लाख डोसच्या प्रारंभिक खरेदीस मान्यता दिली होती.त्यापैकी 32,870 डोस पहिल्या टप्प्यात आणले गेले आहेत. ” असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पुढे, जून 2021 च्या संपूर्ण महिन्यासाठी या वयोगटातील लसीकरणासाठी 36,580 डोस आरक्षित करण्यात आले आहेत, जे या लक्ष्य गटाला त्वरेने लसीकरण करण्याच्या आमच्या हेतूसाठी पुरेसे नाहीत.
“सरकारने अन्य शासकीय मान्यताप्राप्त उत्पादकांकडून लसी घेण्याचा प्रयत्न केला आहे. भारत सरकारकडून लहान मुलांना लस खरेदी करण्याच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे.” सरकारचे विधानातं म्हटले आहे.
Sorry, there was a YouTube error.