वास्को:गोयंकारपण वृत्त
लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याच्या वाढत्या तक्रारीनंतर वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा यांनी मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्यासह बायणा येथील रविंद्र भवनमधल्या लसीकरण केंद्राला भेट दिली.
पाहणीनंतर आल्मेदा म्हणाले, की काही लोकांनी लसीकरण केंद्रात प्रचंड रांगा लागत असल्याच्या तक्रार केल्या होत्या.लसीकरण मोहिम सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रावर दोन स्वयंसेवक ठेवले जातील.
लोकांना स्वतःची काळजी घेतल्यास वाढीव लॉकडाउनची गरज नाही.
दरम्यान, उपजिल्हाधिकारी सचिन देसाई म्हणाले की, लसीकरण केंद्रावरील व्यवस्था व्यवस्थित असून तेथे लांब रांगा लागत नाहीत.
तथापी,गर्दी टाळण्यासाठी 45 वर्षावरील ज्या लोकांनी ऑनलाईन नोंदणी केली असेल त्यांना खास रांग तयार केल्या जाईल.
18 वर्षांवरील वयोगटातील लसीकरण सुरू झाले नसल्याने,18 वर्षांवरील लोकांनी लसीकरण केंद्रावर न येण्याचे आवाहनही देसाई यांनी केले.
Sorry, there was a YouTube error.