मडगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाणावलीचे आमदार चर्चिल अलेमाव यांना सांगितले की, गोव्याच्या समुद्रावर काम करणाऱ्या खलाशांना 1 जूनपासून लसीकरण सुरू करण्याचे आश्वासन दिले
‘टीका उत्सव’ मोहिमेस
14 एप्रिल रोजी बाणावली मतदार संघात प्रारंभ करणारे पहिले आमदार असलेले चर्चिल म्हणाले की, प्रत्येक नागरिकांना त्यांच्या दारात लसीकरण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की त्यांनी गोव्याच्या समुद्री खलाशांना प्राधान्य तत्त्वावर लसी देण्यासाठी पत्र दिले होते. काही काळापूर्वी दुबई आणि लंडनमध्ये काम करणाऱ्या या गोमंतकीयना लस देण्यास सुरवात केली होती.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपली विनंती मंजूर झाल्याची माहिती आज त्यांना दिले.
चर्चिल यांनी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे आभार मानतांना सांगितले, की समुद्रात प्रवास करणारे खलाशी आणि परदेशात काम करणारे इतर गोमंतकीय यांना कोरोना योद्धा मानले जातील आणि मंगळवारपासून ही सुविधा पुरविली जाईल.
Sorry, there was a YouTube error.