पणजी :गोयंकारपण वृत्त
राज्यात जोरदार वारा आणि गडगडाटी वादळाची शक्यता असल्याने राज्य नियुक्त व्यावसायिक लाइफगार्ड एजन्सी ‘दृष्टि मरीन’ यांनी एक सल्ला (एडव्यायसरी )जारी केला आहे.समुद्र किनारपट्टीवर खवळेला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी ) दिलेल्या सतर्कतेनुसार, उत्तर आणि दक्षिण गोव्यातील वेगळ्या ठिकाणी तुरळक विजांच्या व वादळी वार्यासह ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वेगाने वारे वाहू शकतात. 16 मे रोजी 40 कि.मी. पासून ताशी 60 कि.मी. वेगाने वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, समुद्र अत्यंत खवळेला असण्याची शक्यता आहे. 16 मे रोजी वेगवान प्रवाह आणि उच्च लाटांचा सामना होऊ शकेल. 16 आणि / किंवा 17 मे रोजी पावसाच्या हालचाली वाढण्याची अपेक्षा आहे.
‘ आयएमडी’ने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे की, गोवा-महाराष्ट्र किनाऱ्यावरील समुद्रात जाऊ नये आणि 15 मेपासून खवळलेला समुद्र शांत होईपर्यंत समुद्रात जावू नये.
राज्यत ‘कर्फ्यू ‘आणि सध्याच्या हवामानच्या पार्श्वभूमीवर, दृष्टि यांच्या देखरेखीखाली सर्व किनाऱ्यावर लाल झेंडे लावले गेले असून हे काटेकोरपणे ‘नॉन-स्विम झोन’ आहेत.जीवरक्षक समुद्रकिनार्यावरील भागाचे निरीक्षण आणि गस्त ठेवत आहेत. कोणत्याही वेळी दुर्घटना घडू शकते आणि आमची लाइफगार्ड फोर्स प्रथमोपचार, सीपीआर आणि एईडी प्रशिक्षित आहेत. ते किनाऱ्यावर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत पोचवणारे पहिले दाता आहेत.दृष्टि मरीन हवामानाच्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी दररोज आयएमडीकडे हवामानाचा अहवाल तपासते.