पणजी -गोयंकारपण वृत्त
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गुरुवारी माहिती दिली की, 20हजार लिटर ऑक्सिजनसह टँकर गोमेकॉच्या सुपर स्पेशॅलिटी ब्लॉक येथे पोहोचला आहे आणि आधी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांची टीम लवकरात लवकर रूग्णांना हलवणार आहेत.
राणे म्हणाले, “आमचे पथक अमूल्य जीव वाचविण्यासाठी आणि या साथीच्या रोगापासून वाचवण्यासाठी एकत्रितपणे संघ म्हणून काम करत आहे.”
ते म्हणाले की, सरकार गोमेकॉच्या ‘सुपर स्पेशॅलिटी ब्लॉक’मध्ये लवकरात लवकर 150 ‘आयसीयू बेड’ सुरू करणार आहेत.
गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या उपस्थितीत आरोग्यमंत्री राणे यांची पदीर्घ अशी बैठक झाली. आरोग्य खात्याचे संचालक डॉ. डीसा, डॉ. अनार खांडेपारकर, डॉ. विराज, ‘एचएसएससी’चे अधिकारी संदीप जैन, नर्स आणि अन्य घटकासोबत सुपर स्पेशलिटी ब्लॉकमधील 150 आयसीयू बेड सुरू करण्याच्या तयारीबद्दल चर्चा झाली.
“सर्व उपकरणे लवकरात लवकर खरेदी केली जातील आणि येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही पुरेशे ऑक्सिजन व बेडअसल्याची खात्री करुन घेऊ.” राणे म्हणाले
ते पुढे म्हणाले की,सुपर स्पेशलिटी ब्लॉकमधील 150 आयसीयू बेड सुरु करण्यासाठी
इतर सुविधांमध्ये साफसफाईचे काम, आवश्यक असणारे कर्मचारी आणि अन्य कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बोर्डमधील सुविधा व्यवस्थापन एजन्सीसोबत चर्चा करण्यात येईल.
“सोडेक्सो टीम रुग्णांना योग्य पोषक आहार देण्यास आमची मदत करेल.” ते पुढे म्हणाले.
दरम्यान, राणे म्हणाले की आम्ही लवकरात लवकरसुपर स्पेशलिटी ब्लॉकमधील सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने काम करीत आहोत.
1
/
8
#JustCasual With Amit Patkar | “Amit Patkar Ko Gussa Kyun Aata Hai?”
#JustCasual With Joshua De Souza Speaks Candidly on Mapusa, Politics & Michael Lobo,”
#JustCasual With Archit Shantaram Naik GPYC Chief “NOT A NEPO KID, WORKED HARDTO REACH HERE
#JustCasual With Valmiki Naik“Common Minimum Programme Before Seat Sharing”
#JustCasual With Dixon Vaz“South Goa has maintained its identity,”
#JustCasual || Rajan Korgaonkar: Pernem Still Waiting for Mopa Airport Benefits
1
/
8







