पणजी:गोयंकारपण वृत्त
महामारीच्या काळात राजकारण केले जात असल्याबद्दल विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 18 ते 45 वर्षांच्या लोकांना कोरोनाविरोधी लस विनामूल्य मिळणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
सावंत म्हणाले, “मनिपाल रुग्णालयाने उत्पादकांकडून लसी खरेदी केली असेल आणि म्हणूनच ते काही पैसे आकारत असतील. पण राज्यातील 18 ते 45 वर्षातील व्यक्तींना सर्व लस विनाशुल्क दिले जाईल,”.
सावंत म्हणाले की, या वर्गवारीतील लोकसंख्येसाठी राज्याने 5 लाख डोससाठी विनंती केली आहे.त्यांनी आतापर्यंत 38 हजार लसींचे वाटप केले असून ते पुरेसे नाहीत,आणि म्हणूनच आम्ही 5 लाख लसच्या एकूण कोट्याची वाट पाहत आहोत, नंतरच आम्ही लसीकरणाला सुरू करू,” ते म्हणाले.
मंगळवारी झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीबाबत ते म्हणाले, की विरोधी पक्षाच्या राजकारण्यांना या साथीच्या काळातही राजकारण खेळायचे आहे. मी सर्वपक्षीय बैठका दोन वेळा बोलवल्या होत्या,पण गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई त्या वेळेस उपस्थित नव्हते. कदाचित ते निवडणूक प्रचारात व्यस्त असतील किंवा त्यांचे ईमेल, फोन संदेश किंवा कॉल वाचत नसतील, ”सरदेसाई यांनी सर्वपक्षीय बैठकीसाठी मागणी केल्याबाबत प्रश्न विचारता सावंत म्हणाले.
ते म्हणाले की, गेल्या बैठकीत रोहन खंवटे यांच्यासह सर्व आमदार उपस्थित होते.पण विजय सरदेसाई यांच्या पक्षाचा कोणीही बैठकीस सामील झाला नाही.”
“आम्ही येथे लोकांचे हित व कल्याण करण्यासाठी असून राजकारण खेळण्यासाठी नाही. त्यामुळे अशा वायफळ बोलण्यांवर मला भाष्य करण्याची इच्छा नाही, असे ते म्हणाले.
Trending
- Balrath Buses Only for Students Within 3 km: Goa CM
- GBA Unveils State Ranking Badminton Tournaments for July–August 2025
- Ishaan vs Ashank in U11 Final; Tisha, Sachi Enter U13 Girls Title Clash
- Jasprit Bumrah Breaks Silence on Ball Controversy in Third Test Against England: ‘Can’t Control It, Just Focus on the Game’
- Young Innovators Bring Goa’s Creative Capital Vision to Life at Maker’s Asylum
- ‘Female Athletes Should Be Idolised, Not Silenced’: Neeraj Chopra Condemns Murder of Tennis Star Radhika Yadav
- ‘Don’t Jump to Conclusions’: Aviation Minister Urges Patience Over Air India Crash Probe
- ‘No Let-Up in Cross-Border Terror’: MEA Slams Pakistan’s Continued Backing of Terrorism Against India