नवी दिल्ली:गोयंकारपण वृत्त
कोविड -19 पासून जे लोक पॉझिटीव्ह झाले आहेत, त्यांनी रोगमुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत लसीसाठी जाऊ नये, अशी शिफारस सरकारी समितीने दिली असल्याची माहिती ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ने दिली आहे.
त्याच पॅनेलने असेही म्हटले आहे,की कोविडशिल्टच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविले पाहिजे. गर्भवती महिलांनी त्यांची लस स्वतः निवडण्यास सक्षम असावे, असे ‘पीटीआय’ने आज सांगितले.
‘ कोव्हॅक्सिन’च्या डोस अंतरासाठी या अहवालात कोणताही बदल सूचित केलेला नाही. या शिफारसी नुकत्याच झालेल्या लसीकरणाच्या ‘राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहा’च्या बैठकीत करण्यात आल्या आहेत.
दुसर्या डोसच्या आधी जे पॉसिटीव्ह सापडले आहेत, त्यांनी संसर्गातून बरे झाल्यानंतर दुसऱ्या डोसच्यआधी चार ते आठ आठवडे प्रतीक्षा करावी, पॅनेलने अशी शिफारस केली आहे.
तसेच, कोविड रूग्ण ज्यांना ‘मोनोक्लोनल अँटीनबॉडीज’ किंवा ‘कँवालेसेंट प्लाझ्मा’ देण्यात आले आहेत ते रूग्णालयतून बाहेर पडल्यापासून तीन महिन्यांपर्यंत लसीकरण थांबवू शकतात, असे या शिफारसींमध्ये म्हटले आहे. ज्याला इतर गंभीर आजार आहे त्यांना रुग्णालयात दाखल करणे किंवा ‘आयसीयू’त काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांनी पुढील लसी घेण्यापूर्वी चार ते आठ आठवड्यांपर्यंत थांबावे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सद्य प्रोटोकॉलनुसार, कोविड संसर्गापासून बरे झाल्यानंतर चार ते आठ आठवड्यांनंतर ही लस घ्यावी लागते आणि गर्भवती व स्तनपान देणाऱ्या महिलांना हे औषध दिले जाणार नाही.
या शिफारशी अशा वेळी आल्या आहेत, की अनेक राज्यांनी लसींची कमतरता नोंदविली आहे आणि ते आयात करण्यासाठी जागतिक निविदा भरणार असल्याचे म्हटले आहे.