पणजी -गोयंकारपण वृत्त
गोवा सरकारने 10 मे पासून राज्यात लागू होणाऱ्या राज्यव्यापी ‘कर्फ्यू’ची अंमलबजावणी 31 मे पर्यंत आणखी आठ दिवसांनी वाढवली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.
कोविड प्रकरणे आणि कोविडशी निगडित मृत्यूंमध्ये होणारी वाढ लक्षात घेता सरकारने 10 मे ते 23 मे या कालावधीत 15 दिवसांचा राज्यव्यापी कर्फ्यू लागू केला होता. यावर आज नव्याने घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले, “कर्फ्यू सध्याच्या स्वरूपात सुरूच राहणार आहे आणि सध्याचे निर्बंधही कायम राहतील.सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानें कर्फ्यू कालावधीत सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खुले असतील;”
सावंत म्हणाले, की कर्फ्यूच्या कालावधीत आवश्यक वस्तू, किराणा दुकाने, मद्य दुकानांची विक्री सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास तसेच मेडिकल स्टोअर आणि रेस्टॉरंटमधील स्वयंपाकघरांना कर्फ्यूच्या कालावधीत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
देशातील दुसर्या क्रमांकाचा सकारात्मकता दर लक्षद्वीपनंतर गोव्याचा लागत
आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गोव्याची कोविड सकारात्मकता दर 37% आहे.
मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, कोविड लसींसाठी राज्य सरकार जागतिक निविदा मागवणार आहे. राज्य ‘वॉक-इन ‘लसींच्या मागणीला तोंड देत आहे.
ते म्हणाले, “परराज्यातील लोकाना ‘कोव्हिन पोर्टल’वर नोंदणी करण्यास आणि गोव्यात लस घेण्यापासून आम्ही रोखू शकत नाही.”
काल गोव्यामध्ये 1582 ताज्या कोरोनाव्हायरस प्रकरणाची भर पडली असून संक्रमणाची संख्या 1,41,567 tइतकी झाली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिका ऱ्याने दिली.
एकट्या गुरुवार दिवशी राज्यात 44 लोकांचा बळी गेला. राज्यातील मृत्यूची संख्या 2272 वर पोहोचली आहे.
गोव्यात आतापर्यंत 7,73,765 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत 1,18,487 पुनर्प्राप्त प्रकरणे आणि 20,808 सक्रिय प्रकरणे नोंदली गेली आहेत.