दाबोलि:
गोवा कस्टमच्या ‘एअर इंटेलिजेंस युनिट’ने 21लाख 78 हजार 474 रुपये किंमतीचे 512 ग्रॅम वजनाचे चार तुकडे बुधवारी जप्त केले.
गोवा कस्टमच्या ‘एअर इंटेलिजेंस युनिट’चे प्रमुख व सहाय्यक आयुक्त कस्टम श्री वाय बी सहारे यांच्या पथकाने सदर सोने एका प्रवाशाकडून ताब्यात घेतले आहे.
हा प्रवाशी दाबोलि आंतरराष्ट्रीय विमानतळावर हैदराबादहून येणाऱ्या इंडिगो उड्डाण क्रमांक 6E -6913 मधून दाखल झाला होता .
कोची विमानतळावर दुबईहून एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाने तस्करी केलेले सोने आणले होते आणि कोची ते हैदराबादहून गोवा येथे देशांतर्गत तेच विमान जाणार असल्याची माहिती असल्याने उड्डाणातच हे सोने सोडून देण्यात आले होते.
मूळ पश्चिम बंगालमधील रहिवासी असलेल्या एका प्रवाशाने गोव्याला विमानाने प्रवास करतांना हैदराबाद येथील विमानातील सोडून दिलेले सोने उचलले होते . पण सतर्क असलेल्या गोवा ‘डीआरआय’ अधिकाऱ्यांनी गोवा कस्टमच्या सहकार्याने या प्रवाशाला अटक केली.
त्याच्याकडे विविध नावे असलेली 4 आधार कार्ड असल्याचे आढळले आहे.
सदर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास प्रक्रिया चालू आहे. गोवा सीमाशुल्कने जानेवारी 2021 च्या सुरुवातीच्या काळात अशाच पद्धतीने सोने चोरीच्या मोडस ऑपरेंडीचा भांडाफोड केला होता.
Keep Reading
Add A Comment
Comment