मडगाव :गोयंकारपण वृत्त
कोविड -19 चे संकट हाताळण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशानंतर, दक्षिण गोवा वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे धाव घेतली आहे.राज्य सरकारला आवश्यक दिशानिर्देश जारी करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेनुसार, राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा व्हावा असे संघटनेने इच्छा व्यक्त केले आहे. पीडित रूग्णांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त बेड तयार करण्याची व रूग्णांना जीवनरक्षक औषधांचा पुरेसा पुरवठा करण्याची मागणी वकिलांनी केली आहे.
“कोरोना बाबत चाचणी कार्यक्रम वाढवून वेळेवर तपासणी करणे आणि सर्व वयोगटातील कोरोनाविरूद्ध लसीचा पुरेसा पुरवठा व्हावा” असे वकिलांनी याचिकेत म्हटले आहे.
कोविड वार्डातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांवर होणारी छळवणूक व हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांना पुरेशी सुरक्षा उपाय देण्याची प्रार्थना केली आहे.
महामारीने असह्य झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी गोवा राज्यत डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचार्यांची भरती करण्याची मागणी केली आहे.
Trending
- Air India Flight to London with 232 Onboard Crashes Near Ahmedabad Airport After Takeoff
- MLAs Salkar, Amonkar Back Taxi Operators Against App Aggregators
- On average, one person dies every day due to road accidents: Goa CM
- Sonam Raghuvanshi’s Cousin Linked to Payment in Husband Raja’s Murder, Say Police
- Hindu Kush Himalayas Face Heightened Risk of Floods, Landslides This Monsoon: ICIMOD Report
- Katra-Srinagar Vande Bharat Train Fully Booked for 10 Days Amid Unprecedented Demand
- Bhatti Sports Club Storms into Semifinals with 5-1 Win Over Cumborda SC
- Sourav Ganguly’s Straight Talk to Shubman Gill: Use Bumrah Wisely, Step Up as a Leader