डिचोली -गोयंकारपण वृत्त
राज्य सरकारने नुकसान भरपाईची रक्कम थेट बाधित झालेल्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे. ते शेतीच्या नुकसानिचिही भरपाई देण्याच्या विचारात आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
डिचोली मधील लोकांना धनादेश व भरपाईची पत्रे हस्तांतरित केल्यानंतर मुख्यमंत्री आज बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “धनादेश देण्याऐवजी पैसे थेट त्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत.आजतागायत 250 हून अधिक जणांना थेट त्यांच्या बँकांमध्ये रक्कम मिळाली आहे. मये येथील गौ शालेत वीज पडल्याने 16 जनावरे मरण पावली. त्यांना देखील भरपाई दिली आहे ”
सेवा पुनर्संचयित करण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या सर्व विभागांचे आणि कामगारांचे डॉ सावंत यांनी कौतुक केले.