पणजी:गोयंकारपण वृत्त
आल्तीनो येथील वन भवनात संभाव्य तिसरे लाटेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी, नव्याने स्थापन केलेल्या राज्य ‘टास्क फोर्स ‘ची तथा सुकाणू समितीची पहिली बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षते खाली काल घेण्यात आली या बैठकीला
आरोग्य मंत्री विस्वजीत राणे, मुख्य सचिव पॅरिमल राय (आयएएस),आरोग्य सचिव, रवी धवन, (आयएएस), गोमेकॉचे डीन डॉ एस. बांदेकर ; आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जो डिसा व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत यांनी संभाव्य तिसऱ्या लहरच्या संदर्भात व्यापक दृष्टिकोनची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले.या लाटेसंबधीत सर्व माहिती गोळा करून पंधरवड्यातून त्याबाबतीत तयारी प्राधान्याने आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ. सावंत यांनी,राज्यातील खाजगी व्यवसायांकडून शासकीय प्रोटोकॉलमध्ये पालन करत जात असलेल्या
नियमांचे अवलंबन
करण्याचे आवाहन केले. आयुष्य मंत्रालयाच्या संयुक्त प्रोटोकॉलचा समावेश असलेल्या उपचार पद्धती स्वीकारावे आणि प्राधान्याक्रमाने पालक आणि मुलांची प्रतिकारशक्ती सुधारणेची विनंती केली.
आरोग्य खात्याच्या आणि गोमेकॉच्या तज्ञ आणि वरिष्ठ डॉक्टरांनी महत्वाच्या सूचना मांडल्या.डॉ. जगदिश काकोडकर (टास्क फोर्सचे सदस्य सचिव) आणि डॉ. मिमी पी. सिल्वरा (पेडट्रिक्स मुख्य )यांनी या विषयावर त्यांचे पॉवरपॉईंट सादरीकरण दिले. समितीने मे 22 या दिवशी तिसऱ्या लाटेच्या सज्जता दिशेने वेगवेगळ्या उपायांसाठी आणि ठोस निर्णय घेण्याकरता तज्ज्ञची बैठक घेण्याचे निश्चित केले.