पणजी :गोयंकारपण वृत्त
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, खाण महामंडळ स्थापन करण्याबाबत याआधीच निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या संदर्भात फाइल कायद्याचl विभागात पाठविली गेली आहे.
” तीन वर्षांच्या खाण बंदीचे निराकरण करण्यासाठी, प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने ‘गोवा राज्य खनिज महामंडळ ‘ (जीएसएमसी) स्थापन करण्याची घोषणा केली. मुख्यमंतत्र्याच्या 2021-22 सालच्या अर्थसंकल्प भाषणात, खनिज संसाधन लिमिटेड’ कडे (एमसीएल) खनिज संसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि संभाव्य खाण साइट्स ओळखण्यासाठी देखील एक समंजस्य करार करण्यास प्रस्तावित केले.
“खनिज उपक्रमांचे पुनरारंभ आणि खाणीवर अवलंबून असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी, माझ्या सरकारने न्यायव्यवस्थेच्या अधिकाराने आणि केंद्र सरकाच्या मदतीने काम सुरु केले आहे, असे सावंत यांनी सांगितले.
Keep Reading
Add A Comment