मडगाव :गोयंकारपण वृत्त
मडगावातील मुख्य एसजीपीडी मासे मार्केट हे कोरोनासंबधी कठोर नियमांमुळे बंद असल्यामुळे
काही विक्रेत्यानी हाऊसिंग बोर्डमध्ये बेकायदेशीर मासळी बाजार सुरु केला आहे.
मासळीचे घाऊक व्यावसायिक
मॉलुना इब्राहिम म्हणतात, की त्यांनी कोरोनाच्या काळात प्रत्येक सावधगिरीची पाऊल उचललेआहेत.आमचा व्यवसाय पूर्ण थांबवून प्रशासनाला सर्व सहकार्याही दिले.
“मात्र गृहनिर्माण मंडळात जे काय चालले आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. काही दिवसांपूर्वी आमच्या सदस्यांनी मला गृहनिर्माण बोर्ड मध्ये मासळी विक्री होत असल्याचे सांगितले होते.आम्ही गर्दी टाळण्यासाठी सदर बेकायदेशीर व्यापार थांबविण्यासाठी पोलिसांना माहिती दिली होती.परंतु पोलिसांनी कोणतीही कृती का केली नाही हे समजत नाही . “ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, बॉय नावाच्या एका व्यक्तीने मासे वाहनांमधून पैसे गोळा करून आपण अधिकार्यांची काळजी घेईन आणि कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही. मी उच्च स्तरावरील अधिकाऱ्यांना हफ्ता देत असल्याचे सांगितले.
‘गोयंकारपण ‘ने सूर्योदयआधी या बाजाराला भेट दिली. पोलिसंच्या उपस्थितीत देखील बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी आढळली.
येथील पिंपळ कट्टा जवळ मोठे फळ मार्केट दररोज भरले जात असल्याचे ‘गोयंकारपण’ला देखील लक्षात आले आहे.केवळ 2 पोलिस कर्मचारी या बाजारात नावाला उपस्थित असल्याचे आढळून आले आहे. मडगाव आणि मायना कुडतरी पोलिसांनी या उल्लंघनाकडे दुर्लक्ष केले आहे.
कर्फु घोषित झाल्यानंतर राज्य सरकारने एसएचपीडीएने घाऊक मासे मार्केट थांबविण्याचा नोटीस दिली असली तरी किरकोळ मासळी सुरु ठेवण्यात आले आहे. अखेरीस, फातोर्डा पोलिसांनी संपूर्ण बाजार बंद करण्यासाठी मासळी विक्रेते आणि भाजी, फळ विक्रेत्यांना सांगितले. खरं तर फातोर्डा पोलिसांनी संपूर्ण एसजीपीडी बाजारपेठे बंद केले होते. त्याच वेळी मडगाव आणि मायना कुडतरी पोलिसांनी गांधी मार्केट आणि इतर भागातील मासे आणि फळे व्यवसाय करण्यासाठी मुक्त हात दिला.बाजारातील परिसरात पाहणी करत असताना एसपी दक्षिण आणि टीमने बेकायदेशीर कसिनो सुरु असल्याचे आढळून आले होते. मडगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आग्नेलो फर्नान्ड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, त्यांनी कोणालाही कर्फुचे उल्लंघन करत असेल तर पालिका निरीक्षक आणि कर्मचारी यांना सरकारच्या आदेशानुसार कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.