पणजी :गोयंकारपण वृत्त
जुने रायबंदर हॉस्पिटलमध्ये आश्वासन दिल्यानुसार ‘हेल्थ सेंटर’ सुरू करण्यात अपयशी ठरल्यामुळे पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी ऍड.आयरिश रॉड्रिग्ज यांनी केली आहे.
त्या ठिकाणी अनावश्यक आयुष केंद्राला परवानगी देण्याऐवजी आमदाराने हा जनतेचा विश्वासघात केला असल्याचे निदर्शनास आणून अॅड. रॉड्रिग्ज यांनी नमूद केले आहे, की गेल्या वर्षी 9 ऑक्टोबरला जेव्हा त्यांचे १० सदस्यीय शिष्टमंडळ बाबूश मोन्सेरातला भेटले तेव्हा पणजीच्या आमदाराने आश्वासन दिले होते की कुठल्याही मार्गाने का होईना हेल्थ सेंटर वेगाने रायबंदर हॉस्पिटलमध्ये स्थापित केले जाईल याची खात्री करुन घ्यावी. पणजीचे माजी उप मेयर यतीन पारेख हे त्या बैठकला आणि त्या खोटे आश्वासनाला साक्षीदार होते.
अॅड. रॉड्रिग्ज पुढे म्हणाले की, बाबूश मोन्सेरात यांनी आश्वासन दिले होते की सुरुवातीला हे 30 खाटांचे आरोग्य केंद्र असेल आणि शेवटी गुन्हे शाखा आणि लोकायुक्त यांची कार्यालयेही तेथून हलविण्यात आल्यानंतर ते पूर्ण दर्जाचे रूग्णालयात वाढविण्यात येईल.
पणजी आमदार जनतेशी केलेल्या सर्व आश्वासनांबाबत अपयशी ठरले आहेत, असे प्रतिपादन करून अॅड. रॉड्रिग्ज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांना आवश्यक अशा आरोग्य केंद्राच्या महत्त्वाच्या विषयावरुन फसवण्यात आले आहे.ज्यामुळे केवळ दाट लोकवस्तीचा रायबंदरच नव्हे तर शेजारच्या चिंबेल, मेरशी , ओल्ड गोवा आणि दिवार बेटातील रहिवाशांनाही याचा फायदा झाला असता.
अॅड. रॉड्रिग्ज यांनी हेही निदर्शनास आणून दिले आहे की 15 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिष्टमंडळाला आरोग्य केंद्र उभारणीचे आश्वासन दिले होते आणि त्याच दिवशी आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी पणजीच्या आमदारांसह जुने रायबंदर हॉस्पिटलला भेट दिली होती.जाहीरपणे त्यांनी सांगितले की आरोग्य सेवा संचालनालय आणि गोवा मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हे 30 खाटा असलेले केंद्र सुरू होईल, नंतर हळूहळू पूर्ण रुग्णालयात विस्तारित केले जाईल.
अॅड. रॉड्रिग्ज यांनी नमूद केले आहे की प्रस्तावित रायबंदर हेल्थ सेंटर फाईल आरोग्यमंत्र्यांनी सहा महिन्यांपूर्वी मंजूर केली होती. परंतु केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या आयुष मंत्रालयाच्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याला थांबविले होते.
अॅड. रॉड्रिग्ज यांनी हे देखील लक्षात आणून दिले आहे की मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावर्षी 26 जानेवारी रोजी गोवा विधानसभेला आश्वासन दिले होते की हे प्रकरण फोतोर्डचे आमदार विजयी सरदेसाई यांनी उपस्थित केले असता, स्थानिक आमदार बाबूश उपस्थित केले असतांना विधानसभेत एक शब्दही बोलले नाही.
अॅड. रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे की अलीकडेच यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या मनपा निवडणुकीत बाबुश यांनी सार्वजनिकपणे वचन दिले की जुन्या रिबंदर हॉस्पिटलमधील हेल्थ सेंटर या पावसाळ्यापूर्वी प्रत्यक्षात येईल, ते आणि त्याचे तीन रायबंदरचे नगरसेवक आता त्या आश्वासनास जबाबदार आहेत.