पणजी :गोयंकारपण वृत्त
गोमेकॉच्या नव्याने बांधलेल्या सुपर स्पेशॅलिटी ब्लॉकमध्ये बुधवारी दुपारपासून आरोग्य विभाग कोरोना रूग्णांना भरती करण्यास प्रारंभ करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.
सावंत म्हणाले, “मी यापूर्वी आरोग्य विभागाशी बोललो आहे आणि ते आज दुपारी सुरू होणाऱ्या या नवीन सुविधेत कोरोना रूग्णांना दाखल करणार आहेत. या नवीन सुविधेमध्ये २०,००० लीटर ऑक्सिजनची टाकी आहे. ”
मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती दिली, की पंतप्रधानांनी ऑक्सिजन पुरवठा, उत्पादन आणि आवश्यकते बाबत ऑडिट करण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की कोरोना रुग्णांना नवीन ब्लॉकमध्ये हलविण्यात येणार आहे. सर्व 150 बेडवर पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठा बसविला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील कोविड परिस्थितीबद्दल विचारपूस केली.इतर राज्यांसह आम्हालाही संपूर्ण ऑक्सिजन ऑडिट करण्याचे सांगण्यात आले आहे आणि म्हणूनच मी तसे करण्यास सूचना दिल्या आहेत, ” ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, डॉ शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे रूग्णालय स्थापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑक्सिजनची आवश्यकता नसलेल्या रूग्णांना इथे ठेवून उपचार देता येणार नाही .
“चिखली आणि कासावली मध्ये येत्या 5 मेपर्यंत
आणखी दोन दर्जा वाढवलेली रुग्णालये चालू होतील. तसेच पेडणे, डिचोली, वाळपई,
काणकोण आणि कुडचडे येथे अशा प्रकारच्या प्रत्येकी एक रुग्णालये सुरू केली जाऊ शकतात.”
1
/
13
Social Media’s Influence on Goa Politics|Rupesh Kamat & Siddesh Shripad Naik on Political Campaigns
#JustCasual With Cruz Silva | “Why No Padyatra Against 39A?”
#JustCasual With Dixon Vaz | “Will Contest 2027 Election, Come What May”
#JustCasual With Churchill Alemao | “I Don’t Want to Talk About Other Alemaos”
#JustCasual With Vijai Sardesai | “The Cheating Poster Was a Wake-Up Call for Congress”
Alliances or Marriage of Convenience? | Goa Politics 2027 | Just Casual
1
/
13



