कळंगुट :गोयंकारपण वृत्त
आरोग्य केंद्रांवर भार कमी करण्यासाठी कळंगुट ग्रामपंचायतीत सरकारी मान्यता दराने चाचणी केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
कळंगुटचे सरपंच शॉन मार्टिन्स म्हणाले, की सोमवारी, 10 मे 2021 पासून आमचे आमदार आणि बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो आणि झेडपी सदस्य दत्ताप्रसाद दाबोलकर यांच्या सहाय्याने कळंगुट ग्रामपंचायतीतर्फे कळंगुट येथे चाचणी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविडची लक्षणे विकसित झाली असल्यास किंवा कोविड पॉसिटीव्ह व्यक्तीशी संपर्क साधलेल्या सर्व ग्रामस्थांना जवळच्या केंद्रात त्वरित तपासणी करण्यासाठी जाण्याची ग्रामपंचायतीने विनंती केली आहे.
मार्टिन्स म्हणाले, “वेळेवर तपासणी करुन घरी उपचार सुरु करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे आम्ही रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी करू शकतो आणि पुढील वैद्यकीय गुंतागुंत टाळू शकतो,”
लोकांनी चाचणी केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन मार्टिन्स यांनी केले.
“चाचणी घेतल्यानंतर कृपया घरी एकट्याने अलग राहावे आणि आपल्या नकारात्मक अहवालाची वाट पहा. आम्ही आपल्याला मदत करण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी आहोत. कृपया आपल्या संबंधित वार्ड सदस्याशी सम्पर्क साधा ,असे ते म्हणाले .